AUS vs AFG : टी 20 विश्वचषकात पुन्हा एक मोठा उलटफेर घडला. अफगाणिस्तानने (AUS vs AFG) सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय (Australia) मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 149 धावा (Afghanistan) केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 127 धावांवर ऑल आऊट झाला. अफगाणिस्तानच्या गुलबदीने नायबने धारदार गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या. नवीन उल हकनेही तीन विकेट घेतल्या. विश्वचषकातील हा आणखी एक उलटफेर ठरला. विशेष म्हणजे, पॅट कमिन्सने याही (Pat Cummins) सामन्यात हॅट्ट्रीक घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं. त्यामुळे अफगाणिस्तानला जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र, गोलंदाजांची मेहनतीवर फलंदाजांनी पाणी ओतलं आणि अफगाणिस्तानने एक मोठा विजय साकारला.
नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करत अफगाणिस्ताने 148 धावा केल्या. गुरबाजने 60 धावा केल्या. इब्राहिम जादराननेही 51 धावा केल्या. या दरम्यान पॅट कमिन्सने धारदार गोलंदाजी करत पुन्हा हॅट्ट्रीक केली. अॅडम झाम्पाने दोन विकेट घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया सहज विजयी होईल असेच वाटत होते.
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंप! इमारती कोसळल्या, 2 हजार जणांचा मृत्यू
परंतु, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. त्यांच्या गोलंदाजांसमोर कांगारू फलंदाजांनी शरणागतीच पत्करली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण वीस ओव्हर्सही खेळू शकला नाही. 19.2 ओव्हर्समध्ये 127 रन बनवून अख्खा संघ ऑल आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूत 59 धावा केल्या. कर्णधार मिचेल मार्शने 12 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने 11 धावा केल्या. सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड यावेळी (Travis Head) शून्यावरच बाद झाला. मॅथ्यू वेडने पाच धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. गुलाबदीन नायबने चार ओव्हरमध्ये 20 रन देत 4 विकेट घेतल्या. नवीन उल हकने 20 रन देत 3 विकेट घेतल्या. कर्णधार राशिद खानने सुद्धा एक विकेट घेतली. ओमरजईनेही एक विकेट घेतली. ठराविक अंतराने विकेट मिळत गेल्या त्यामुळे माफक आव्हानही ऑस्ट्रेलियाला पार करता आले नाही.
Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा
ऑस्ट्रेलिया संघ मजबूत आहे. विश्वचषकात तर हा संघ कायमच लयीत असतो. त्यामुळेच आतापर्यंत सात वेळा कांगारूंनी विश्वचषक उंचावला आहे. परंतु, यावेळी सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तान समोर पराभव पत्करला. सन 2021 मध्येही ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. तसेच सहा वेळे, विश्वकप जिंकला आहे. यामध्ये 1987, 1999, 2003, 2007, 2015 आणि 2023 मधील विश्वचषकांचा समावेश आहे.