Download App

T20 World Cup मध्ये आज IND vs PAK; पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यावर पावसाचं सावट

IND vs PAK अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

Image Credit: letsupp

T20 World Cup IND vs PAK : अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत आज ( 9 जून ) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK 2024) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याकडे जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. हवामान विभागाकडून न्यूयॉर्कमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

PM Modi Oath Ceremony : आठ हजार विशेष अतिथी, स्वादिष्ट मेजवानी… असा पार पडणार मोदींचा शपथविधी

T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील ही 19 वी मॅच असेल आज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार आठ वाजता हा सामना सुरू होईल. अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरांमध्ये हा सामना पार पडणार आहे. मात्र यावेळी हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाला आहे. त्यावेळी पावसाची शक्यता 30 ते 40% आहे. दुपारी एक वाजेनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

NEET Exam तील गैरप्रकारावर समिती गठीत; विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे पुनर्मूल्यांकन होणार

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा (Ireland) आठ गडी राखून पराभव केला आहे तर पाकिस्तानला (Pakistan) पहिल्या सामन्यात अमेरिकेने (USA) धक्का देत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे.

राज्यात मान्सूनची दमदार आगेकूच! पुढील 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

India probable playing XI: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

Pakistan probable playing XI: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमिर.

follow us

वेब स्टोरीज