Download App

ICC कडून टी-20 वर्ल्डकप संघाची घोषणा; फक्त एका भारतीय खेळाडूला मिळाले स्थान

  • Written By: Last Updated:

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने महिला T20 विश्वचषक 2023 साठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. आयसीसीने या टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये 11 खेळाडूंचा समावेश केला आहे. सहाव्यांदा महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाकडून चार खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे, तर भारताकडून केवळ एक खेळाडू या संघाचा भाग बनू शकले आहे.

आयसीसीने इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटची कर्णधार म्हणून निवड केली आहे. या संघात ऑस्ट्रेलियाच्या 4 खेळाडूंना स्थान मिळाले आहे, तर दक्षिण आफ्रिकेतील 3 खेळाडूंची आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये निवड झाली आहे. या प्लेइंग इलेव्हनमध्ये इंग्लंडचे 2, तर भारत आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. यापैकी वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरी खेळू शकला नाही. इतर संघातील खेळाडू उपांत्य फेरीत खेळले.

या संघातील एकमेव भारतीय खेळाडू ऋचा घोष आहे, जिने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने उत्कृष्ट फलंदाजीसह विकेटच्या मागेही उत्कृष्ट कामगिरी केली. रिचाने 5 सामन्यात एकूण 136 धावा केल्या, ज्यामध्ये तिने एकही अर्धशतक झळकावले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यामध्ये ती लवकर बाद झाली, ज्यात भारताचा पराभव झाला.

आजपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुनावणी

ICC महिला T20 विश्वचषक 2023 साठी स्पर्धेतील संघ: ताजमिन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका), अ‍ॅलिसा हिली (विकेटकिपर), लॉरा वोल्वार्ड (दक्षिणआफ्रिका), नॅट स्काइव्हर-ब्रंट (कर्णधार) (इंग्लंड), एश गार्डनर (ऑस्ट्रेलिया), रिचा घोष (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), करिश्मा रामहारक, शबनम इस्माईल (दक्षिण आफ्रिका), डार्सी ब्राउन (ऑस्ट्रेलिया), मेगन शुट (ऑस्ट्रेलिया) आणि ओरला प्रेंडरगास्ट (आयर्लंड, 12वी खेळाडू).

Tags

follow us