Download App

वेस्ट इंडिजचा चॅम्पियन खेळाडू आता दिसणार अफगाणिस्तानच्या संघात, बजावणार मोठी भूमिका

T20 World Cup : पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये T20 विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह स्पर्धेत सहभागी

T20 World Cup : पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिज (West Indies) आणि अमेरिकामध्ये (America) T20 विश्वचषकाची (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघानी जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेत मोठ्या संघाला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने (Afghanistan) मोठा निर्णय घेत संघात वेस्ट इंडिजच्या एका चॅम्पियन खेळाडूला संघात सहभागी केला आहे.

या खेळाडूने वेस्ट इंडिज संघाला 2012 आणि 2016 T20 विश्वचषकामध्ये चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा खेळाडू दुसरा कोणी नसून  वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आहे.

T20 विश्वचषक 2024 साठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी सल्लागार म्हणून ड्वेन ब्राव्होची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तान संघाने टी-20 मध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि यामुळे हा संघ कोणत्याही संघाला पराभव करण्याची ताकद ठेवतो. तर ड्वेन ब्राव्होची या संघात गोलंदाजी सल्लागार म्हणून निवड करण्यात आल्याने अफगाणिस्तान संघाची गोलंदाजी आणखी मजबूत होणार आहे. यामुळे या विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ड्वेन ब्राव्होला संपूर्ण जगात  T20 लीग  खेळण्याचा अनुभव असून T20 लीगमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे.  T20 फॉरमॅटमध्ये ब्राव्होच्या नावावर तब्बल 625 विकेट्स आहेत.

मोठी बातमी, वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणात बोट उलटली , 7 जण बुडल्याची माहिती

सेंट किट्स आणि नेव्हिसमध्ये सुरु असलेल्या अफगाणिस्तानच्या सराव शिबिरात ब्राव्हो संघासोबत असणार आहे. या शिबिरात तो अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजीला आणखी धार देण्याचा  प्रयत्न करेल.

follow us