ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार

ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार

Cricket Australia Calls Off with Afghanistan : क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा (Cricket Australia) एकदा अफगाणिस्तानात क्रिकेट मालिका खेळण्यास (Afghanistan) नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामागे अफगाणिस्तानातील तालिबान (AUS vs AFG) हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. कारण, अफगाणिस्तानात अजूनही महिला क्रिकेट संघांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याआधीही अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला होता. तसेच एक वनडे मालिकाही ऑस्ट्रेलियाने रद्द केली होती. 2022 मधील टी 20 विश्वचषक आणि 2023 मधील वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरोधात खेळले होते.

India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी

ऑगस्ट 2024 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे होते. परंतु, ऑस्ट्रेलियाने नकार दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका पुढे ढकलली आहे. मालिका केव्हा होईल याची माहिती मात्र दिलेली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया जगभरातील महिला आणि मुलींच्या क्रिकेटमधील योगदानासाठी आपली प्रतिबद्धता कायम राखील. भविष्यात द्विपक्षीय सामने पुन्हा सुरू करण्यासाठी आयसीसी आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्याबरोबर काम करील असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानबरोबर खेळण्यास नकार देण्याची ही तिसरी वेळ आहे. खेळात महिलांच्या सहभागावर तालिबानने बंदी आणली होती. या निर्णयावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीका केली होती. याचा निषेध म्हणून अफगाणिस्तानविरुद्धचा कसोटी सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीला युएईमध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही ऑस्ट्रेलियाने खेळण्यास नकार दिला होता. आता पुन्हा ऑगस्ट 2024 मध्ये होणारी मालिका पुढे ढकलली आहे.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; ‘या’ ठिकाणी खेळणार पहिला सामना

follow us
  • fb
  • instagram
  • youtube