ब्रेकिंग! पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धविरामावर सहमती, कतारमध्ये मोठा निर्णय

कतारच्या दोहा येथे झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली.

Pakistan Afghanistan Agree On Casefire

Pakistan Afghanistan Agree On Casefire : कतारच्या दोहा येथे झालेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या तीव्र सीमावाद आणि संघर्ष संपवण्यासाठी ही चर्चा करण्यात आली. या संघर्षात आतापर्यंत डझनभर लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. तुर्कीच्या मध्यस्थीखाली हा समझोता झाला आहे, अशी माहिती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी पहाटे दिली.

युद्धविरामाची पार्श्वभूमी

गेल्या काही दिवसांत पाकिस्तान-अफगाण (Pakistan Afghanistan Agree On Casefire) सीमेजवळ झालेल्या भीषण चकमकींमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. 2011 मध्ये काबुलमध्ये तालिबान पुन्हा सत्तेवर आल्यानंतरचा हा सर्वात मोठा संघर्ष मानला जातो. या वाढत्या हिंसेमुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चा सुरू करण्याची गरज निर्माण झाली आणि कतारमध्ये दोहा येथे बैठक घेण्यात (Qatar Meeting) आली.

दोन्ही देशांचे प्रतिनिधी…

अफगाणिस्तानकडून संरक्षणमंत्री (Pakistan) मुल्ला मोहम्मद याकूब यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळ चर्चेत सहभागी झाले. तसेच अफगाण राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख देखील या बैठकीत होते. पाकिस्तानकडून संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी या चर्चेचे नेतृत्व केले. दोन्ही पक्षांमध्ये सीमावर्ती (Afghanistan) हिंसा थांबवण्यासंबंधी आणि भविष्यात शांतता टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली.

पाकिस्तानचे आरोप

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आरोप केला आहे की, त्यांच्या सीमेलगतच्या भागांत हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना अफगाण भूमीवर आश्रय दिला जात आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, चर्चेचा मुख्य उद्देश सीमापार दहशतवादावर नियंत्रण आणणे आणि पाक-अफगाण सीमेवर स्थैर्य प्रस्थापित करणे हा होता.

तालिबानची प्रत्युत्तर भूमिका

तालिबान सरकारने पाकिस्तानचे आरोप फेटाळले असून उलट पाकिस्तानवर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण करण्याचा आणि इस्लामिक स्टेट (IS) समर्थित गटांना मदत केल्याचा आरोप केला आहे. तालिबानने स्पष्ट केलं की, ते कोणत्याही दहशतवादी गटांना पनाह देत नाहीत आणि त्यांच्या भूमीतून इतर देशांवर हल्ले होऊ नयेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पाकिस्तानने मात्र या सर्व आरोपांना खोडून काढत म्हटलं की, काही अतिरेकी गट पाकिस्तान सरकार उलथवण्यासाठी आणि कट्टर इस्लामी राजवट स्थापण्यासाठी दीर्घकाळापासून सक्रिय आहेत.

शांततेसाठी पहिलं पाऊल

शनिवारी तालिबान सरकारने पुष्टी केली की, अफगाण प्रतिनिधीमंडळात संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख सामील होते. याच वेळी पाकिस्तानकडूनही प्रतिनिधीमंडळ दोहा रवाना झाल्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही देशांनी आपली ‘संरक्षणात्मक’ भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, ते एकमेकांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देत आहेत. मात्र कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेतून दोन्ही बाजूंनी अखेर युद्धविरामाचा मार्ग स्वीकारला आहे.

follow us