T20 World Cup-मुंबईत हिटमायर, पॉवेलचे वादळ; झिम्बाब्वेसमोर 254 धावांचा डोंगर

West Indies VS Zimbabwe: हेटमायरने 34 चेंडूत 85 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने सात चौकार आणि सात षटकार मारले.

West Indies

West Indies

West Indies VS Zimbabwe : टी-20 वर्ल्डकपमधील सुपर आठमधील लढतीत वेस्ट इंडिजच्या (West Indies) फलंदाजांनी झिम्बाब्वेची ( Zimbabwe) गोलंदाजांची धुलाई करत 254 धावांचा डोंगर उभा केलाय. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) अवघ्या 19 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवत विक्रम केला. हेटमायरने 34 चेंडूत 85 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने सात चौकार आणि सात षटकार मारले. तर रोवमन पॉवेलनेही 35 चेंडूत 59 धावांची जोरदार खेळी केली. त्यानेही चार चौकार आणि चार षटकार मारले.


टी 20 वर्ल्डकपमधील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या

वेस्ट इंडिजने या टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावसंख्या केलीय. या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 254 धावा केल्यात. टी-20 वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा इतकी मोठी धावसंख्या उभारली गेलीय. जेसन होल्डरनेही 4 चेंडूत 13 धावा केल्या, तर शेरफेन रदरफोर्डने 13 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली.

शिमरन हेटमायरचा विक्रम
हेटमायरने 19 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. वेस्ट इंडिजकडून इतके वेगवान अर्धशतक झळकविणारा हेटमायर पहिला फलंदाज आहे. त्याने आपलाच विक्रम मोडला आहे. त्याने याच वर्ल्डपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध कोलकाता येथे 22 चेंडूत अर्धशतक झळकविले होते.

झिम्बाब्वेची प्रत्युत्तरात मोठी पडझड
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेची खराब सुरुवात झाली. दोन्ही सलामीवीर वीस धावांत तंबूत परतले. तडीवनाशे मरुमणी हा 14 धावांत बाद झाला. तर ब्रायन बेनेटही पाच धावांवर बाद झाला. त्यानंतर झिम्बाव्वेने तिसरी विकेटही वीस धावांवर घेतली. रायन बर्ल हा खातंही उघडू शकला नाही. धावा करण्याचा प्रयत्नात झिम्बाब्वेचे तीन फलंदाज झटपट बाद झाले आहे.

Exit mobile version