MK Stalin यांच्याकडून माहीचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, “IPL मधून निवृत्त…”

MK Stalin Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) म्हणजेच माहीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असले तरी त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये आदराचे स्थान अद्याप कायम आहे. माहीच्या चाहत्यांमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना स्टॅलिन यांनी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T112048.846

MK Stalin

MK Stalin Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (M S Dhoni) म्हणजेच माहीचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असले तरी त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये आदराचे स्थान अद्याप कायम आहे. माहीच्या चाहत्यांमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना स्टॅलिन यांनी माहीचे तोंडभरून कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांनी माहीचे कौतुक करत असताना आयपीएलमधून निवृत्त न होण्याची विनंती यावेळी त्याने केली आहे.

मी माहीचा मोठा चाहता- स्टॅलिन
तामिळनाडू चॅम्पियन्स फाउंडेशन आणि मुख्यमंत्री ट्रॉफीचा लोगो लॉन्च करत असताना स्टॅलिन यांनी सांगितले आहे, सगळ्यांसारखा मी देखील महिला मोठा चाहता आहे. मला आशा आहे की, तामिळनाडूचा हा ‘दत्तक’ सुपत्र चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणे सुरूच ठेवणार आहे. तो भारतात लाखो युवकांसाठी एक प्रेरणा स्थान आहे.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी महिने कौतुक करत असताना राज्यात खेळाडूंचा उत्साह वाढवला पाहिजे. माहीचा भारतात लाखो युवकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेला आहे. आम्हाला तामिळनाडूमधून केवळ क्रिकेटमधूनच नाहीतर इतर खेळामध्ये देखील अनेक माही तयार करायचे आहेत. खरं म्हणजे माही हा ४१व्या वर्षी देखील आयपीएल खेळत आहे.

आशिया कपमधून पाकिस्तान आऊट?; भारताचं पारडं जड

आयपीएलच्या १६व्या हंगामामध्ये देखील माही चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. हा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, तर त्यामध्ये त्यामध्ये ६ सामने जिंकले आहेत. माहीच्या संघाला ४ सामने गमवावे लागले आहेत. १३ गुणांसह चेन्नई सुपर किंग्ज आताच्या घडीला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

Exit mobile version