IND Vs IRE: पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. एवढेच नाही तर जसप्रीत बुमराहकडे संघाच्या कर्णधारपदाची देण्यात आली आहे. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यावर फक्त तरुण खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुराज गायकवाडला आयर्लंड दौऱ्यासाठी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगला अखेर टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. जितेश शर्मालाही आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. बुमराहशिवाय दुखापतीतून बाहेर पडणारा प्रसिद्ध वेगवान गोलंदाज कृष्णा याचेही संघात पुनरागमन झाले आहे. बऱ्याच काळानंतर शिवम दुबेलाही टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे.
दिग्गज खेळाडूंना विश्रांती
18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यापासून सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
Hariyana Violence : आता हरियाणा पेटलं! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ, जीव वाचवण्यासाठी लोकं मंदिरात…
रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
राहुल-अय्यर यांची अजूनही प्रतिक्षा
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनाची चाहत्यांना प्रतिक्षा होती पण या मालिकेत दोनही खेळाडूंची निवड झालेली नाही. यामुळे राहुल-अय्यर आशिया चषकासाठी उपलब्ध असतील की नाही याबाबत बीसीसीआयकडून सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही.
Shah Rukh Khan; ओळख न देणारे हेमंत बिस्वा सरमा अखेर शाहरुखच्या प्रेमात
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.