India Squad : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची (India Squad) घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असेल. तर ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. याशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
विशाखापट्टणम व्यतिरिक्त या मालिकेतील सामने तिरुअनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहेत. त्याच वेळी, भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील.
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेचं किंग; मानाची गदा पटकावली
वेळापत्रक असे आहे
– पहिला सामना- 23 नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
– दुसरा सामना- 26 नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
– तिसरा सामना- 28 नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
– चौथा सामना- 1 डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
– पाचवा सामना- 03 डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका; जाणून घ्या टाईमटेबल ते लाईव्ह स्ट्रिमिंग
टीम इंडिया प्लेईंग-11
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार
🚨 NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank T20I series against Australia announced.
Details 🔽 #INDvAUShttps://t.co/2gHMGJvBby
— BCCI (@BCCI) November 20, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग-11
मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.