Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेचं किंग; मानाची गदा पटकावली

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेचं किंग; मानाची गदा पटकावली

Maharashtra Kesari : नांदेडच्या शिवराज राक्षे(Shivraj Rakshe) याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला चीतपट करुन महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेत आपल्या नावावर मानाची गदा करुन घेतली आहे. दीड मिनिटांचा बाकी असताना हर्षवर्धन सदगीरला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही हर्षवर्धन सदगीरने हार मानली नव्हती. शेवटपर्यंत लढत करुन हर्षवर्धनला पराभव स्विकारावा लागला आहे. धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Maratha Reservation : धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभांवर पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?

धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत माती आणि मॅट अशा दोन्ही स्पीचवर सेमीफायनल लढत झाली होती. यामध्ये मॅटवर शिवराज राक्षे व पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात शिवराजने बाजी मारत अंतिम सामन्यात धडक मारली. तर माती गटामध्ये हर्षवर्धन सदगीर विरुध्द गणेश जगताप असा सामना झाला त्यात सदगीर विजयी ठरला.

बावनकुळे मकाऊमध्ये तीन पत्ती खेळत असल्याचा फोटो काँग्रेसकडून शेअर

हर्षवर्धन व शिवराज यांची मॅटवर लढत झाली, पहिल्यापासुन दोघांनी आक्रमक खेळ केला पण मॅटची सवय असलेल्या व उंचीचा फायदा घेत शिवराजने गुणांची कमाई केली. तरीही हर्षवर्धन देखील तितक्याच ताकदीने लढत होता. शेवटी सामन्याला दिड मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन याच्या हाताला दुखापत झाली.

World Cup 1987 : एक्स्ट्रा पास नाकारले अन् मराठी माणसाने वर्ल्डकपची स्पर्धाच भारतात आणली!

तेव्हाच शिवराज चार व हर्षवर्धन शुन्य असा स्कोर होता. काही काळ थांबुन त्याने पुन्हा मैदानात अवतरला. वेळ कमी व दुखापतीला झुंज देत तो शिवराजला भिडत होता. पण शिवराजनेही युक्तीचा वापर करत वेळ घालवत विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र केसरी होण्याचा मान शिवराज याने मिळवला आहे. शिवराज राक्षेने हर्षवर्धनला चीतपट करीत मानाची गदा पटकावली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube