Asia Cup 2025 Team India Beat Bangladesh : आशिया कप 2025 टी 20 स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट ठरला आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत दाखल झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ग्रुप स्टेजपासून सुपर-4 पर्यंत सलग विजयांची मालिका कायम ठेवत फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
सुपर-4 मधील दुसऱ्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 41 धावांनी पराभव (Team India Beat Bangladesh)करून लढतीचं तिकीट मिळवलं. या विजयामुळे भारताने केवळ फायनलमध्ये (Asia Cup 2025) प्रवेश मिळवला नाही, तर बांग्लादेशविरुद्ध टी 20 फॉरमॅटमधील 18 पैकी 17 वा विजय मिळवला. त्याचसोबत भारताने 12 व्यांदा आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा विक्रम केला.
बुधवारी (24 सप्टेंबर) दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने (Cricket) प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशची संपूर्ण टीम केवळ 127 धावांत गुंडाळली गेली. त्यामुळे भारताने दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये आपला हक्क प्रस्थापित केला. या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेबाहेर फेकली गेली. श्रीलंका आधीच आपले सामने हरलेली असल्याने शेवटचा सामना जिंकूनही फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
𝗜𝗻𝘁𝗼 𝗧𝗵𝗲 𝗙𝗶𝗻𝗮𝗹! 👍
The winning run continues for #TeamIndia & we seal a place in the summit clash of the #AsiaCup2025, with a game to spare in #Super4! 🙌 pic.twitter.com/AV40ifvIiv
— BCCI (@BCCI) September 24, 2025
28 सप्टेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा प्रतिस्पर्धी कोण असेल? याचे उत्तर गुरुवारी (25 सप्टेंबर) मिळेल. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यातून दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. दोन्ही संघांचे सुपर-4 मधील 2 सामने होऊन 2 गुण झाले आहेत. पाकिस्तानला भारताकडून पराभव स्विकारावा लागला, तर श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला. बांग्लादेशनेही श्रीलंकेला हरवलं, पण भारताकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे आता पाकिस्तान वि. बांग्लादेश सामन्यातील विजेताच अंतिम फेरी गाठणार आहे.
फॉर्म पाहता बांग्लादेशचा संघ पाकिस्तानपेक्षा जास्त सक्षम मानला जातो. बांग्लादेशने आधीच अफगाणिस्तान आणि श्रीलंकेवर मात केली आहे आणि भारतालाही आपल्या गोलंदाजीने त्रास दिला होता. त्याउलट पाकिस्तानला भारताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात निराशा मिळाली, तसेच श्रीलंका हरवण्यासाठीही संघर्ष करावा लागला.