टीम इंडियाची टी20 विश्वचषकात विजयी सलामी; अमेरिकेवर 29 धावांनी मात

टीम इंडियाने शनिवारी टी20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देत अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत डाव सावरला.

Untitled Design (392)

Untitled Design (392)

Team India defeated America in the first match : टीम इंडियाने शनिवारी टी20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देत अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. अमेरिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलं. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारीची आणि आक्रमक खेळी करत संघाचा डाव सावरला.

भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने नाबाद 84 धावांची वादळी खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. आपल्या डावात त्याने 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. सूर्यकुमारच्या खेळीच्या जोरावर भारताने अमेरिकेसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवलं. अमेरिकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 132 धावा करू शकला आणि भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला.

भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत; काय म्हणाले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत?

भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने 3 बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वरुणनेही 1 महत्त्वाची विकेट घेतली. टी20 विश्वचषकातील भारताचा पुढील सामना 12 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध होणार असून हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

Exit mobile version