Download App

“टीम इंडियाला मुंबईच्या ‘बेस्ट’मधूनच फिरवा”; गुजरातच्या बसला रोहित पवारांचा रेड सिग्नल

वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 

Team India : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आता भारतीय संघ (Team India) देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई नगरी (Marine Drive) या विजयी खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. लोकांची तोबा गर्दी झाली आहे. येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळाडूंचा मोठा सत्कार होणार आहे. तसेच भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. अशी सगळी तयारी झालेली असतानाच दुसरीकडे राजकारणही सुरू झालं आहे. भारतीय संघाच्या रॅलीसाठी जी बस आणण्यात आली आहे ती बस गुजरातवरून आणण्यात आली आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. वर्ल्डकप आणि टीम इंडियाची रॅली मुंबईच्या बेस्ट बसमधूनच काढायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे.

Video : टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार अन् CM शिंदेंची भेट; सरकारही देणार हटके शुभेच्छा

मुंबईत दाखल होण्याआधी खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. पीएम मोदींनी खेळाडूंचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला. यानंतर आता टीम इंडिया मुंबईत येत आहे. येथेही भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत होणार आहे. रॅलीही काढली जाणार आहे. या रॅलीसाठी जी बस वापरण्यात येणार आहे त्यावर रोहित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रोहित पवार म्हणाले, टीम इंडियाला सर्वांनीच ताकद दिली. त्यामुळे भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. या गोष्टीचा आम्हालाही आनंद आहे. आता भारतीय महाराष्ट्रात मुंबईत येत आहे. त्यामुळे ही रॅली मुंबईतील बेस्ट बसमधूनच काढण्यात यावी. जर भारतीय संघाने मुंबईच्या बेस्ट बसचा उपयोग केला तर आम्हाला आनंदच होईल. यासाठी आम्ही बीसीसीआयला विनंती करू. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे, असे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.

IND vs ZIM : टीम इंडियानंतर झिम्बाब्वेही सज्ज; संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूच्या हाती कमान

गुजरातच्या बसला पार्किंगसाठी आम्ही चांगली जागा उपलब्ध करून देऊ. पण, मुंबईतील रॅलीसाठी बेस्ट बसचाच उपयोग केला पाहिजे असेही रोहित पवार म्हणाले. दरम्यान, भारतीय खेळाडू मुंबईत आल्यानंतर येथील वानखेडे स्टेडियमवर त्यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. यानंतर शहरातील ठराविक मार्गांवरून रॅली काढण्यात येणार आहे.

follow us

वेब स्टोरीज