Video : टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार अन् CM शिंदेंची भेट; सरकारही देणार हटके शुभेच्छा
Team India : टीम इंडियाने टी 20 विश्वचषक पटकावल्यानंर आज भारतीय संघाचं (Team India) मुंबईत जंगी स्वागत करण्यात येणार आहे. (Mumbai) याआधी संघातील खेळाडू बार्बाडोस येथून (Barbados) राजधानी नवी दिल्लीत पोहोचले होते. येथेही हजारोंच्या (New Delhi) गर्दीने त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. मुंबईत आल्यानंतर आता खेळाडू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
दरम्यान, बार्बाडोस येथून भारतात आल्यानंतर आज दुपारी भारतीय संघातील खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदींनी संघातील खेळाडूंना या अभूतपूर्व विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या खेळाडूंशी चर्चाही केली.
एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’ मधून निवृत्ती
या खास कार्यक्रमाचे निमंत्रण खेळाडूंना देण्यात आले आहे. आता या कार्यक्रमासाठी सर्व पक्षाच्या आमदारांनी उपस्थित राहावं यासाठी विधानसभा अध्यक्षांना विनंती करणार आहोत, असे सरनाईक यांनी सांगितले. टी 20 विश्वचषकात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं. तब्बल अकरा वर्षांनंतर आयसीसी विजेतेपद पटकावलं.
भारतीय संघाच्या या कामगिरीचं देशभरातून स्वागत होत आहे. क्रिकेट चाहते कमालीचे आनंदीत झाले आहेत. राजकारणीही यात मागे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Narendra Modi) अनेक दिग्गजांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता टीम इंडियाच्या खेळाडूंचा हटके सत्कार करण्याचा प्लॅन सरकारने तयार केला आहे.
IND vs SA : दहा वर्षात दहा टुर्नामेंटमध्ये पराभव..आता भारताला विजेतेपदाची नामी संधी
रोहित वर्ल्डकप जिंकणारा तिसरा कर्णधार
कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) नंतर ३७ वर्षीय रोहित शर्मा हा टी-२० विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. भारतीय कर्णधार आता जिंकलेल्या ५० टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विश्वचषक अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील ५वा विजय आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात संघाकडून अप्रतिम कामगिरी केल्यानंतर रोहितने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारलं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत एकही सामना न गमावता टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. यामुळे ११ वर्षांनी आयसीसीची ट्रॉफी जिंकत भारताने दुष्काळ संपवला.