Vaibhav Suryavanshi : भारतीय संघात एन्ट्री करणार वैभव सूर्यवंशी; ‘या’ खेळाडूची घेणार जागा

Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेटमध्ये आज सर्वात जास्त चर्चेत असणारा नाव म्हणजे वैभव सुर्यवंशी. आयपीएल 2026 मध्ये आपल्या शानदार

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेटमध्ये आज सर्वात जास्त चर्चेत असणारा नाव म्हणजे वैभव सुर्यवंशी. आयपीएल 2026 मध्ये आपल्या शानदार खेळीच्या जोरावर वैभवने अनेकांची मने जिंकली आहे. या शानदार कामगिरीमुळे सोशल मीडियावर देखील वैभव चर्चेत आहे. सध्या वैभव शानदार कामगिरी करत असल्याने तो भारतीय संघात कधी दिसणार? असा सवाल आता सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे.

तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलनंतर (IPL) भारतीय संघ आयर्लंडचा (Ireland) दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ (Team India) दोन टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी वैभव सुर्यवंशीची भारतीय संघात निवड होणार असं सांगितलं जात आहे. जर आयर्लंड दौऱ्यात वैभव सुर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली तर तो सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे. पण तो कोणाचे स्थान घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सध्या भारतीय टी20 संघात टॉप ऑर्डरमध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) , ईशान किशन (Ishan Kishan) , अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि कर्णधार सुर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) खेळत आहे. त्यामुळे वैभव सुर्यवंशी कोणत्या स्थानावर खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे या दौऱ्यासाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंचा संघात समावेश केला तर वैभव भारतासाठी  डावाची सुरुवात करु शकतो. जर 2028 च्या टी20 विश्वचषकासाठीच्या नियोजनात वैभवचा समावेश केला गेला, तर त्याला फलंदाजीसाठी कोणत्या क्रमांकावर (बॅटिंग पोझिशनवर) पाठवले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भूषण प्रधानची ‘स्वप्नसुंदरी’ 24 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला-

वैभवने आतापर्यंत आयपीएलमध्ये अवघ्या 12 सामन्यांत 452 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा एकूण ‘स्ट्राइक रेट’ 228.28 इतका प्रभावी आहे.

प्रत्येक वेळी ते एक मास्टरक्लाससारखं वाटायचं; दिवंगत अभिनेते असरानी यांना अक्षय कुमारकडून श्रद्धांजली

Exit mobile version