प्रत्येक वेळी ते एक मास्टरक्लाससारखं वाटायचं; दिवंगत अभिनेते असरानी यांना अक्षय कुमारकडून श्रद्धांजली

Akshay Kumar On Asrani :  ‘भूत बंगला’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि त्याच्या ट्रेलरने

Akshay Kumar On Asrani

Akshay Kumar On Asrani :  ‘भूत बंगला’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि त्याच्या ट्रेलरने बहुप्रतीक्षित हॉरर-कॉमेडी जगाची झलक दाखवली आहे. विनोद आणि थरार यांचा उत्तम संगम असलेला हा चित्रपट एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजन ठरेल, असे आश्वासन देतो. याच दरम्यान, अक्षय कुमार यांनी दिवंगत दिग्गज अभिनेते असरानी (Asrani) यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि एक मनापासूनचा संदेश शेअर केला.

‘भूत बंगला’च्या (Bhoot Bangla) रिलीजच्या एक दिवस आधी, अक्षय कुमार यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत असरानी यांना आठवत त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आणि त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींबद्दल लिहिले. त्यांनी लिहिले “कधी कधी एक फोटो फक्त आठवणींचा तुकडा नसतो… तो संपूर्ण प्रवास आपल्या आत सामावून घेतो. हा फोटो ‘भूत बंगला’च्या शूटिंगदरम्यानचा आहे… असरानीजींसोबत माझा दुसरा शेवटचा चित्रपट. आम्ही एकत्र एकूण 12 चित्रपट केले, आणि प्रत्येक चित्रपटात मी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकलो… प्रत्येक वेळी ते एक मास्टरक्लाससारखं वाटायचं. ते जेव्हा कॉमेडी करत, तेव्हा सगळं खूप सोपं वाटायचं, पण प्रत्यक्षात ती एक खूप कठीण कला आहे. असरानीजी त्याचे उस्ताद होते आणि कायम राहतील. ‘भूत बंगला’ उद्या रिलीज होत आहे… माझ्यासाठी हा फक्त एक चित्रपट नाही, तर एक आठवण आहे… एक श्रद्धांजली आहे… त्या दिग्गजाला सलाम आहे. असरानीजी, तुम्ही नेहमी आठवत राहाल.”

याशिवाय, ‘भूत बंगला’ हा दिवंगत अभिनेते असरानी यांच्या निधनापूर्वीच्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमार आणि असरानी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, ज्यामध्ये ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘दे दना दन’, ‘खट्टा मीठा’, ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या अप्रतिम कॉमिक टायमिंगमुळे असरानी यांनी अनेक कल्ट क्लासिक्स दिले आणि भारतीय सिनेमात मोठे योगदान दिले.

रंगभूमीवर अनोखा प्रयोग ‘भुल भुलैय्या’; कुमार सोहोनी यांचं 125 वं नाटक प्रेक्षक भेटीला

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बालाजी मोशन पिक्चर्स (बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडचा एक विभाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या सहयोगाने बनलेला ‘भूत बंगला’ या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांनी केली आहे. ‘भूत बंगला’चे पेड प्रिव्ह्यू 16 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 वाजल्यापासून चित्रपटगृहांमध्ये सुरू होतील.

follow us