Download App

यशस्वीपासून नवदीप सैनीपर्यंत… विंडीज दौऱ्यासाठी या 5 खेळाडूंचे उघडले नशीब

  • Written By: Last Updated:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला.

वनडे आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पुजारा, उमेश यादव या खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. त्याचबरोबर मोहम्मद शमीलाही विश्रांती देण्यात आली आहे. विंडीज मालिकेसाठी निवडकर्त्यांनी काही युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि त्यांना प्रथमच कसोटी किंवा एकदिवसीय संघात स्थान दिले. त्याचबरोबर काही खेळाडूंनी प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करण्यातही यश मिळवले आहे. (team-india-sqaud-west-indies-tour-sanju-samson-navdeep-saini-yashavi-jaiswal-ruturaj-gaikwad-mukesh-kumar)

1. यशस्‍वी जैस्वाल: युवा फलंदाज यशस्‍वी जैस्वाल यांना वनडे आणि कसोटी अशा दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. 21 वर्षीय यशस्वीने आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी उत्तम प्रदर्शन करत. एक शतक आणि पाच अर्धशतकांसह 163.61 च्या स्ट्राइक रेटने 14 सामन्यात 625 धावा केल्या. यशस्वीचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

2. ऋतुराज गायकवाड: या फलंदाजाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती, पण लग्नामुळे ऋतुराजने आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वाल टीमसोबत स्टँडबाय म्हणून लंडनला गेला. आता ऋतुराजला प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे, तर तो एकदिवसीय संघातही परतला आहे.

3. संजू सॅमसन: यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचेही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संजूला संधी मिळाली नाही. संजूने 2022 मध्ये एकूण 10 एकदिवसीय सामने खेळले आणि 71 च्या सरासरीने 284 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 100 च्या जवळ होता.

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.. पाहा कोणाला संधी, कोणाला डच्चू?

4. मुकेश कुमार: वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. मुकेशची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. बिहारचा असलेल्या मुकेशने आतापर्यंत 39 प्रथम श्रेणी सामन्यात 149 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर लिस्ट-ए मध्ये त्याच्या 26 विकेट्स आहेत.

5. नवदीप सैनी: उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दोन वर्षांनंतर कसोटी संघात परतला आहे. ३० वर्षीय नवदीप जानेवारी 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

कसोटी संघ:
रोहित शर्मा (C), अजिंक्य रहाणे (VC), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (WC), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ:
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC) शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (WC), इशान किशन (WC), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Tags

follow us