Download App

Team India : विजयाचा जल्लोष, वानखडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने धरला ढोल ताशावर ठेका, पाहा व्हिडिओ…

टी - 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत विश्वविजेता ठरलेला भारतीय संघाचे (Indian team) मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केल्या गेलं.

Team India Mumbai Road show: टी – 20 क्रिकेट (T-20)स्पर्धेत विश्वविजेता ठरलेला भारतीय संघाचे (Indian team) मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत केल्या गेलं. मरीन ड्राईव्हवरून वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रोहित शर्माने (Rohit Sharma) चाहत्यांच्या गराड्यात जाऊन ढोल ताशांच्या ठेक्यावर ताल धरला.

विधानपरिषद निवडणूक! घोडेबाजार करायचा असेल तर उमेदवार ठेवा; फडणवीसांनी सुनावलं… 

29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर आज रोहितसेना दिल्लीत दाखल झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया सायंकाळी मुंबईत दाखल झाली. दिल्लीनंतर टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत झाले. रोडशो वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चाहत्यांनी टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. हा जल्लोष पाहून क्रिकेटपटूही भारावून गेले. यावेळी रोहित शर्माला स्वत:ला आवरणं कठीण झालं. रोहितने चाहत्यांच्या गराड्यात जाऊन ढोल ताशांच्या ठेक्यावर ताल धरला.

Team India Road Show : न भूतो न भविष्यति जल्लोत्सव, मरीन ड्राईव्हवर उसळला जनसागर 

मिरवणुकीनंतर टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश केला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही डान्स करू लागले. यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू नाचू लागले. वानखेडे स्टेडियमच्या मैदानावर पोहोचताच कर्णधार रोहित शर्माने ढोल ताशांवर ठेका धऱत डान्स केला. यावेळी सर्वच खेळाडू नाचताना दिसले. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा या सगळ्यांनीच डान्स केला.

टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा चेक

विजय मिरवणुकीनंतर टीम इंडियाचा रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड आणि जसप्रीत बुमराह यांनी वानखेडे स्टेडियमवर आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी टीम इंडियाला बक्षिस म्हणून जाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

follow us

वेब स्टोरीज