Download App

टीम इंडियाचे 2024 मध्ये व्यस्त वेळापत्रक; वर्ल्ड कप, आयपीएलसह ‘या’ संघांसोबत होणार सीरिज

Team India cricket schedule : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी काही खास नव्हते. टीम इंडिया या वर्षी भरपूर क्रिकेट खेळली पण दोनदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली. प्रथम ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (Test championship 2023) भारताचा पराभव केला आणि त्यानंतर एकदिवसीय वर्ल्ड कप फायनलमध्येही (World Cup 2023) कांगारूंनी भारताचा पराभव केला. याशिवाय वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्नही भंगले. आता पुढील वर्षी टीम इंडिया कोणत्या संघांविरुद्ध खेळणार? पाहूया 2024 मध्ये भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक…

भारतीय संघ नवीन वर्षाची म्हणजेच 2024 ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीने करेल. यानंतर टीम इंडियाला 11 ते 17 जानेवारी दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. T20 विश्वचषकाव्यतिरिक्त 2024 मध्ये टीम इंडिया अफगाणिस्तान, इंग्लंड, श्रीलंका, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत वेगवेगळ्या फॉरमॅटच्या मालिका खेळणार आहे. याशिवाय आयपीएलचाही थरार रंगणार आहे.

विनेश फोगटकडूनही पुरस्कार परत, पोलिसांनी रोखल्यानं अर्जुन, खेलरत्न पुरस्कार कर्तव्यपथावरच ठेवले

2024 मध्ये टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज आणि यूएसएला जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या परदेश दौऱ्यांव्यतिरिक्त भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंड, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

KBC 15 ला निरोप देताना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाले, ‘देवियो और सज्जनो…’

2024 मध्ये टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक-
– जानेवारी- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी
– 11 ते 17 जानेवारी – अफगाणिस्तान विरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची T20 मालिका
– 25 जानेवारी ते 11 मार्च – घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका
– मार्च ते मे – आयपीएल
– 4 जून ते 30 जून – T20 विश्वचषक
– जुलै – श्रीलंकेत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका
– सप्टेंबर – घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध तीन टी-20 आणि दोन कसोटी मालिका
– ऑक्टोबर 2024- न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका
– नोव्हेंबर-डिसेंबर- ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका

follow us