IND vs AUS : कांगारूंच्या माऱ्यासमोर टीम इंडियाचा डाव 117 धावांवर आटोपला

आज विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर […]

WhatsApp Image 2023 03 19 At 4.06.42 PM

WhatsApp Image 2023 03 19 At 4.06.42 PM

आज विशाखापट्टणम येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीर अपयशी ठरले. गेल्या सामन्यात भारतीय संघाने 39 धावांत चार विकेट्स आणि नंतर 83 धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. या सामन्यात एकूण 49 धावांवर भारतीय संघाच्या पाच विकेट पडल्या. स्टार्कने पहिल्याच षटकात शुभमन गिलला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. शुभमन मागील सामन्यात जसा आऊट झाला होता त्याच पद्धतीने तो बाद झाला.

यानंतर डावाच्या पाचव्या षटकात स्टार्कने कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टार्कने रोहितला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. रोहितला 15 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 13 धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव एलबीडब्ल्यू आऊट झाला. याआधीच्या सामन्यात जसा आऊट झाला होता तसाच सूर्याही बाद झाला. सूर्याला सलग दुसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही.

यानंतर केएल राहुलला मिशेल स्टार्कने आउट केले. राहुलला 12 चेंडूत 9 धावा करता आल्या. स्टार्कने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले. शॉन अॅबॉटने भारताला पाचवा धक्का दिला. त्याने हार्दिक पांड्याला स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद केले. हार्दिकला केवळ एक धाव काढता आली. हवेत डायव्हिंग करताना स्मिथने हा झेल घेतला. भारताला 16व्या षटकात सहावा धक्का बसला. विराट कोहली 35 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

Asim Sarode : ‘किरण रिजिजू हा माणूस मंत्री आहे, म्हणून काहीही बोललेले चालेल का?’ 

91 धावांवर भारताला सातवा धक्का बसला. नॅथन एलिसने रवींद्र जडेजाला कॅरीकरवी झेलबाद केले. त्याला 39 चेंडूत 16 धावा करता आल्या. 103 धावांवर भारताला आणखी दोन धक्के बसले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सीन अॅबॉटने कुलदीप यादवला हेडकरवी झेलबाद केले. त्याला 17 चेंडूत चार धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर मोहम्मद शमीला यष्टिरक्षक कॅरीकरवी झेलबाद केले. शमीला खातेही उघडता आले नाही. स्टार्कने सिराजला क्लीन बोल्ड करून भारताचा डाव 117 धावांत गुंडाळला.

ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, शॉन अॅबॉटने 3 तर नॅथन एलिसने 2 विकेट घेत भारताचा डाव केवळ 117 धावात संपवला.

Exit mobile version