Download App

Women’s T20 World Cup: टीम इंडियाचा आज आर्यलँडसोबत सामना, उपांत्य फेरीसाठी लढणार टीम इंडिया

  • Written By: Last Updated:

ICC महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, 20 फेब्रुवारी रोजी, टीम इंडिया आर्यलँड विरुद्ध आपला चौथा सामना खेळेल. टीम इंडियासाठी हा सामना करो या मरो आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. जर टीम इंडिया हा सामना हरला तर अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग थोडा कठीण होईल. त्यानंतर नेट रनरेटच्या आधारे गट-2 मधील दुसरा संघ निश्चित केला जाईल. कारण या गटात पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे.

विश्वचषकात टीम इंडियाचा प्रवास

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या ICC महिला T20 विश्वचषकात टीम इंडियाने विजयाने सुरुवात केली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यातटीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. तर 18 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हरमनप्रीत कौरच्या संघासाठी आता चौथा सामना करो या मरो असणार आहे. भारताला विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठायची असेल तर हा सामना जिंकावाच लागेल.

IND vs AUS Squad: आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील हार्दिक पांड्याकडे 

टीम इंडियाच्या खेळाडूं मोठी खेळी करण्यात अपयशी

महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना आतापर्यंत मोठी खेळी खेळण्यात अपयश आले आहे. शेफाली वर्मा, स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्याकडून धमाकेदार खेळी होणे बाकी आहे. रिचा घोषला वगळले तर टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंनी निराशा केली आहे. त्याचवेळी, अंतिम सामन्यात भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सर्वांच्या नजरा असतील.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग.

आर्यलँड: एमी हंटर, गॅवी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटल, लॉरा डेन्ली (सी), अर्लेना केली, मेरी वॉल्डर्न, ली पॉल, कारा मरे, जेन मॅग्वायर.

 

Tags

follow us