IND vs AUS Squad: आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील हार्दिक पांड्याकडे

  • Written By: Published:
IND vs AUS Squad: आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील हार्दिक पांड्याकडे

दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या 2 कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात कोणताही बदल झालेला नाही. हार्दिक पांड्या वनडे फॉरमॅटमध्येही पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणार आहे. रवींद्र जडेजाचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे, तर जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.

रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे पहिला वनडे सामना खेळणार नाही. तो दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून संघाचे नेतृत्व करेल. कसोटी संघात उपकर्णधारपदी कोणत्याही खेळाडूला स्थान देण्यात आले नाही. अशा परिस्थितीत केएल राहुल आता संघाचा उपकर्णधार नसणार

आता गिलला संधी मिळू शकते

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील कसोटी संघात कोणत्याही खेळाडूला उपकर्णधार म्हणून ठेवण्यात आले नाही. पहिल्या 2 कसोटीत केएल राहुल उपकर्णधार होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये राहुलला संधी देण्यात आली होती, पण तो 20, 17 आणि एक धावच करू शकला.

जर राहुलचे उपकर्णधारपद कसोटी संघातून काढून घेण्यात आले, त्यामुळे राहुलला त्याच्या खराब कामगिरीमुळे तिसऱ्या कसोटीतून बाहेर केले जाऊ शकते. तर त्याच्या जागी रोहितसह शुभमन गिलसह सलामी करू शकतो. याशिवाय कसोटी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यात बॅचवर असणारे इशान किशन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट संघात कायम आहेत. तिसरी कसोटी 1 मार्चपासून इंदूरमध्ये तर चौथी कसोटी 8 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे.

Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस होणार! 

हार्दिक पांड्याकडे फक्त टी-२० कर्णधारपदाचा अनुभव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडियाला कांगारूंविरुद्ध 3 वनडे सामनेही खेळायचे आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. रोहित शर्मा सध्या पहिला सामना खेळणार नाही. मालिकेतील पहिला वनडे सामना 17 मार्चला मुंबईत, दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत खेळवला जाईल.

हार्दिकने आतापर्यंत वनडेमध्ये संघाचे नेतृत्व केलेले नाही. आतापर्यंत त्याने फक्त टी-20 मध्ये टीम इंडियाची कमान सांभाळली आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली 11 पैकी 8 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.

आता सुषमा अंधारेंचंही ठरलं, ‘मातोश्री’बाबत केलं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक आणि शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट, उमेश यादव आणि कुलदीप यादव.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube