Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस होणार!

Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी सलग तीन दिवस होणार!

पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y.  Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या घटनापीठासमोरच होणार आहे. तसेच सलग तीन दिवस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आता या आठवड्यातही सलग सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. २१, २२ आणि २३ अशी सलग तीन दिवस पाच जणांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे गटामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच म्हणजे सोमवारी (दि. २०) रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्याोमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube