कोण ठरणार सोनेरी गदेचा मानकरी? शिवराज राक्षे-महेंद्र गायकवाड यांच्यात होणार अंतिम लढत

Shivraj Rakshe And Mahendra Gaikwad Final : छत्रपती शिवराय केसरीचा अंतिम सामना शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात थोड्याच वेळात रंगणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा अंतिम सामना रंगणार आहे. पहिल्या सेमिफायनलमध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज द्राक्षे याने माऊली कोकाटेला अस्मान दाखवत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. दुसरी सेमिफायनल सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड […]

Kusti

Kusti

Shivraj Rakshe And Mahendra Gaikwad Final : छत्रपती शिवराय केसरीचा अंतिम सामना शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात थोड्याच वेळात रंगणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा अंतिम सामना रंगणार आहे. पहिल्या सेमिफायनलमध्ये महाराष्ट्र केसरी शिवराज द्राक्षे याने माऊली कोकाटेला अस्मान दाखवत अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

दुसरी सेमिफायनल सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या झाली. सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेत सिकंदरने तीन गुण घेतले. ब्रेकनंतर महेंद्र गायकवाड देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाला आहे. ब्रेकनंतर महेंद्रने एकामागे एक असे एकूण चार गुण मिळवत, अंतिम फेरीत जाण्याचा मान मिळवला आहे.

फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

पहिल्या आणि दुसऱ्या सेमिफायनल सामन्याचे विजेते शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अंतिम सामना रंगणार असून छत्रपती शिवराय केसरीच्या विजेत्याला अर्धा किलो सोन्याची गदा आणि इतर बक्षिसे मिळणार आहेत. दरम्यान, थोड्याच वेळात छत्रपती शिवराय केसरीचा मानकरी कोण होणार? हे स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version