फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक

Chhatrapati Shivarai Wrestling Tournament : अहमदनगर (Ahmednagar) येथे सुरु असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) येणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार होता परंतु त्यापूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाकरे सरकार पडल्याच्या निषेधार्थ नगरच्या जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणातच शिवसैनिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणार होते. पण त्यापूर्वी नगर उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शिक्षक जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे, उपशहर प्रमुखअरुण झेंडे, कामगार सेना गौरव ढोणे यांच्यासह शिवसैनिकांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

‘कुडमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली, ठाकरेंच्या गटातील सगळेच’.. केसरकरांचा राऊतांना टोला

दरम्यान, भाजपा शिवसेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुरु असलेल्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या मल्लाला ३५ लाख किमतीची सुवर्ण गदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या मल्ल्लास 15 लाख किमतीची सुवर्ण गदा देण्यात येणार आहे. ही सोन्याची गदा केवळ 15 दिवसात नगरमध्येच तयार करण्यात आली आहे. सेमी फायनलच्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख यांनी शैलेश शेळके याच्यावर आठ एक अशी मात करून फायनल मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या सेमी फायनल मध्ये हर्षवर्धन सदगीर जखमी झाला होता. आज सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम सामना होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube