‘कुडमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली, ठाकरेंच्या गटातील सगळेच’.. केसरकरांचा राऊतांना टोला

‘कुडमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली, ठाकरेंच्या गटातील सगळेच’.. केसरकरांचा राऊतांना टोला

Deepak Kesarkar on Sanjay Raut : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा दावाही केला होता. राऊत यांच्या वक्तव्यावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या या टीकेवरही वाद होण्याची शक्यता दिसत आहे.

काय म्हणाले राऊत ?

सध्या जो तो आपापल्या पद्धतीने गणित मांडत आहे. आम्ही मात्र निर्णयाची वाट पाहत आहोत. पण, येत्या 15 ते 20 दिवसात हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. याआधीही मी एकदा म्हणालो होतो की हे सरकार फेब्रुवारीपर्यंत कोसळेल. पण, न्यायालयाचा निकाल उशीरा लागत आहे. पण हे सरकार टिकणार नाही. सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. आता सही कोणी आणि कधी करायचे हे देखील ठरल्याचे राऊत म्हणाले होते.

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

राऊत यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी केसरकर यांना प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, राज्यात अलीकडे कुडमुडे ज्योतिषी यांची संख्या वाढली आहे. त्यांच्या गटातील उपनेत्यांसह सगळेच ज्योतिष सांगायला लागले आहेत. त्यामुळे ज्योतिषावर जर राज्याचं भवितव्य ठरायला लागलं तर महाराष्ट्र राज्य त्याला म्हणण्याला काय अर्थ आहे, असे केसरकर म्हणाले.

पवार साहेबांनीच समजून सांगावे 

न्यायालयाला निकाल देण्यासाठी तरी वेळ द्या. तुम्ही रोज त्यावर काही ना काहीतरी भाष्य करत असता. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असता. हे कुठेतरी थांबले पाहिजे. पण थांबवण्यासारखं कुणीच नाही. ते त्यांच्या पक्षातील नेत्यांचे तरी ऐकतात की नाही याची मला शंका आहे. आता मला असे वाटते की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानेच त्यांना समजून सांगण्याची गरज आहे.

..तर आम्ही अजितदादांचे स्वागत करू ; केसरकरांचे सूचक वक्तव्य

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube