आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. (Sports) आयसीसीने बांगलादेश क्रिकेट टीमची भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतून हकालपट्टी केली आहे. आयसीसीला हा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे घ्यावा लागला आहे. बांगलादेशने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भारतात खेळण्यासाठी नकार दिला होता. आयसीसीने सोबतच बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत दुसऱ्या संघाचा समावेश केला आहे.
मुस्तफिजुर रहमान याची आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातून हकालपट्टी करण्यात आली. बांगलादेशमधील हिंसाचारानंतर मुस्तफिजुर याची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी तीव्र मागणी करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने दिलेल्या आदेशानुसार केकेआर फ्रँचायजीने मुस्तफिजुरला रिलीज केलं. इथूनच या वादाला तोंड फुटलं. मुस्तफिजुरला रिलीज केल्याने बीसीबीला भारतात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आठवला. भारतात बांगलादेशचे खेळाडू सुरक्षित नसल्याचं बीसीबीला अचानक जाणवलं.
स्मृतीसोबतच्या लग्नाअगोदर पलाश मुच्छल दुसऱ्या मुलीसोबत बेडवर; टीम इंडियाच्या मुलींकडून बेदम मारहाण
बीसीबीने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशच्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी करण्यात यावं, अशी मागणी आयसीसीकडे करण्यात आली. आयसीसी आपली मागणी पूर्ण करेल, असा विश्वास बीसीबीला होता. मात्र आयसीसीने बीसीबीची ही मागणी फेटाळून लावली. भारतातच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळावं लागेल, असं आयसीसीने बीसीबीला ठणकावून सांगितलं. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि आडमुठ्यापणाच्या धोरणामुळे बीसीबीने हा विषय ताणला. परिणामी बीसीबीला आता या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागलं आहे.
बीसीबाला तगडा झटका
पीटीआयनुसार,बांगलादेशला जवळपास 240 कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. यात ब्रॉडकास्टिंग रेव्हेन्यू, स्पॉन्सरशीप, खेळाडूंचं वार्षिक मानधन या आणि अन्य माध्यमातून होणार्या उत्पन्नाचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरील रक्कम ही बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक कमाईच्या 60 टक्के इतकी असू शकते. यावरुन बीसीबाला किती आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो, याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशला वर्षात आयसीसीच्या एकूण महसूलातील 4.46 टक्के हिस्सा मिळतो. बांगलादेशला महसूलापोटी मिळणारी ही रक्कम जवळपास 27 मिलियन यूएस डॉलर इतकी आहे. एकूणच ब्रॉडकास्टिंगद्वारे क्रिकेट बोर्डाची रग्गड कमाई होते. मात्र आता बीसीबीला यावर पाणी सोडावं लागलं आहे.
आसिम नजरुल काय म्हणाले?
बांगलादेश क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल आणि खेळाडूंची बैठक झाली. नजरुल यांनी या बैठकीनंतर ते आयसीसीच्या सुरक्षा रिपोर्टने समाधानी नसल्याचं म्हटलं. “भारतात आमचे खेळाडू, पत्रकार आणि चाहत्यांच्या सुरक्षेबाबत आम्ही समाधानी नाही. हा शासनाचा निर्णय आहे. तसेच नागरिकांची सुरक्षा याला आमचं प्रथम प्राधान्य आहे”, असं आसिफ नजरुल म्हणाले.
बांगलादेश आणि भारत 2 शेजारी देश आहेत. दोन्ही देशात एकमेकांचे नातेवाईक आहेत. तसेच बांगलादेशातही क्रिकेटची क्रेझ आहे. अशात असंख्य बांगलादेशी क्रिकेट चाहते भारतात येऊन सामन्याची तिकीट खरेदी करतात. बांगलादेश खेळणार नसल्याने तिकीट विक्रीतून होणाऱ्या उत्पनात घट होईल, हे निश्चित आहे. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या रक्कमेचा ठराविक भाग हा बीसीसीआयला मिळणार होता. मात्र आता बांगलादेशवरील या कारवाईमुळे बीसीसीआयच्या कमाईवरही परिणाम जाणवेल. बीसीसीआय क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. बीसीसीआय ही तूट कुठून तरी सहज भरुन काढेल. मात्र बांगलादेश या स्पर्धेत नसल्याने क्वचित आर्थिक नुकसान होणार, हे नाकारुन चालणार नाही.
बांगलादेशचे भारतात वर्ल्ड कप स्पर्धेतील 4 पैकी 3 सामने हे कोलकातात होणार होते. तर 1 सामना मुंबईत नियोजित करण्यात आला होता. बांगलादेशची राजधानी ढाक्यातून कोलकाता आणि मुंबईसाठी थेट विमानसेवा आहे. मात्र आता बांगलादेश येणार नसल्याने फक्त कोलकातालाच अंदाजे 30-60 कोटी रुपये नुकसान होऊ शकतं. बांगलादेशआधी पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणामुळे भारतात खेळण्यास नकार दिलाय. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आयसीसीच्या स्पर्धेतील सामने हे त्रयस्थ ठिकाणी होतात. त्यामुळे पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने सुरक्षेच्या कारणामुळे नकार दिल्याने त्याचा परिणाम भारताच्या आंतरराष्ट्र्रीय प्रतिमेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांगलादेशी खेळाडूंंचं किती नुकसान?
क्रिकेट बोर्डाकडून प्रत्येक खेळाडू्ला वार्षिक करारत श्रेणीनुसार निश्चित रक्कम मिळते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंना निश्चित रक्कम मिळते. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धत सहभागी होणाऱ्या संघाला आयसीसीकडून रक्कम मिळते. प्रत्येक विजयासाठी रक्कम मिळते. मात्र आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाला, खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. आयसीसीने बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या जागी 10 व्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्कॉटलँडचा समावेश केला आहे. स्कॉटलँडला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अचानक संधी मिळण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली आहे. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2009 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा युकेकडे होते.तेव्हा 2009 साली यूके आणि झिंबाब्वे यांच्यात राजकीय तणाव होता. तेव्हा त्याामुळे झिंब्बावेने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे स्कॉटलँडला 2009 साली एकाएकी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संधी मिळाली होती.
स्कॉटलँड संधीचं सोनं करणार का?
दरम्यान टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी 9 संघ थेट पात्र ठरले. तर 3 संघांनी आयसीसी रँकिंगच्या जोरावर वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. तसेच इतर 8 संघांनी पात्रता फेरीतून वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. यात स्कॉटलँड पात्रता फेरीत अपयशी ठरली होती. मात्र आता स्कॉटलँडला या 10 व्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. स्कॉटलँडचं आतापर्यंत साखळी फेरीतच पॅकअप झालंय. त्यामुळे स्कॉटलँड या आयत्या संधीचं सोनं करत इतिहास बदलत आपल्या कामगिरीत सुधारणा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
