Download App

भारतीय संघाला धक्का, इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूंना संधी

India U19 Team : भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध (ENGVsIND) पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे या दरम्यान

  • Written By: Last Updated:

India U19 Team : भारतीय संघ 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध (ENGVsIND) पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे या दरम्यान 19 वर्षांखालील भारतीय संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. अंडर 19 भारतीय संघ (India U19 Team) इंग्लंड दौऱ्यावर 24 जून ते 23 जुलै 2025 दरम्यान एक 50 ओव्हर सराव सामना, 5 युथ एकदिवसीय सामने आणि दोन चार दिवसीय सामने खेळणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वीच भारतीय अंडर 19 संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन स्टार खेळाडू जखमी झाले आहे. आदित्य राणा (Aditya Rana) आणि खिलन पटेल  (Khilan Patel) दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाले आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य राणा याला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाला आहे, तर खिलन पटेल याला उजव्या पायात स्ट्रेस रिॲक्शनची समस्या आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या हाय-परफॉर्मन्स कॅम्प दरम्यान दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयकडून आदित्य राणा आणि खिलन पटेल यांच्या जागी डी. दीपेश आणि नमन पुष्पकला संघात स्थान देण्यात आले आहे.

डी. दीपेश आणि नमन पुष्पक दोन्ही खेळाडूंची निवड सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यावर रिर्जव खेळाडू म्हणून करण्यात आली होती. मात्र आता दोन खेळाडू जखमी झाल्याने त्यांची निवड मुख्य संघात करण्यात आली आहे.

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून शानदार कामगिरी करणारा आयुष म्हात्रे या दौऱ्यावर भारतीय संघाचा नेतृत्व करणार आहे. याच बरोबर या संघात राजस्थान रॉयल्सकडून 35चेंडूत शतक झळकावून चर्चेत आलेला वैभव सूर्यवंशी देखील संघात असणार आहे.

UPI यूजर्स; दिवसात ‘इतक्या’ वेळाच करता येणार बॅलन्स चेक, सरकारने केला मोठा बदल

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर 19 संघ

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधाजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, अनमोलजीत सिंग, डी. दीपेश, नमन पुष्पक.

follow us

संबंधित बातम्या