आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)चुकीमुळे भारत पुन्हा एकदा कसोटीत नंबर-1 बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या रॅकींगमध्ये आयसीसीने आपल्या वेबसाइटवर भारताला कसोटीमध्ये प्रथमस्थानवर दाखवले होते. सहा तासांनंतर आयसीसीने पुन्हा नवीन क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारत पुन्हा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर दाखवले आहे. दरम्यान, ही चूक कशी झाली, का घडली याबाबत आयसीसीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
भारत सध्या टी-2० आणि वनडेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि कसोटीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे 126 गुण असून टीम इंडियाचे 115 गुण आहेत.
गेल्या महिन्यातही अशीच चूक झाली होती
मागच्याच महिन्यात 18 जानेवारीला आयसीसीने क्रमवारीत अशीच मोठी चूक केली होती. दुपारी 1:30 च्या सुमारास ICC च्या अधिकृत वेबसाईटवर भारताला नंबर 1 कसोटी संघ म्हणून घोषित करण्यात आले. अडीच तासांनंतर 4 वाजता भारताला पहिल्या क्रमांकावरून हटवून दुसऱ्या क्रमांकावर टाकले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा नंबर 1 कसोटी संघ बनला होता. तेव्हाही आयसीसीने क्रमवारीतील झालेल्या चुकीवर कोणतंही भाष्य केलं नव्हतं.
कसोटीत भारत नंबर-1 कसा होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकल्यानंतरच भारत हा कसोटीत नंबर 1 ठरेल. त्यानंतर भारताचे 121 गुण होतील आणि ऑस्ट्रेलियाचे 120 गुण होतील. भारत एकदिवसीय आणि टी-2० मध्ये नंबर-1 आहेच, कसोटीत नंबर-1 होताच टीम तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनण्याचा पराक्रम करेल.
ICC Rankings : तिन्ही प्रकारात टीम इंडियाचा डंका !
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार : रोहित पवार यांना लागली चाहूल
वन डे क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 2 गुणांनी आघाडीवर
वन डे मध्ये भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 2 गुणांनी पुढे आहे. भारताचे 114 गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे 112 गुण आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर भारत 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड गुणांवर बरोबरीत आहेत, पण न्यूझीलंडने 29 सामने आणि इंग्लंडने 33 सामने खेळले आहेत. यामुळे न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.
कधी अपडेट केली जाते टीम रॅंकींग?
आयसीसी प्रत्येक मालिकेनंतर टीम रॅंकींग अपडेट करते. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी मालिका 14 फेब्रुवारीला संपली. त्यानंतर 15 फेब्रुवारीला कसोटी संघाची रॅंकींग अपडेट करण्यात आली. आयसीसी रॅंकींगचे वार्षिक अपडेट दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी होते.