फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत ‘सुपर 16’ चा थरार : कोणता संघ उधळणार विजयाचा गुलाल?

FIFA World Cup 2026 उप उपांत्यपूर्व फेरीतील 16 संघ ठरले आहेत. या फेरीत कोणता संघ कोणासोबत भिडणार? चला,जाणून घेऊयात...

FIFA World Cup 2026

FIFA World Cup 2026

Thrill of ‘Super 16’ at FIFA World Cup 2026 Which team will emerge victorious : फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अर्थात उप उपांत्यपूर्व फेरीतील 16 संघ ठरले आहेत. या फेरीत जिंकणाऱ्या 8 संघांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. या फेरीत कोणता संघ कोणासोबत भिडणार? चला,जाणून घेऊयात…

पोलिसांना सांगितलं हार्ट अटॅकचं कारण पण पतिच्या मृत्यूची निघाली थरारक कहाणी

आता 16 संघ आणि एकच ध्येय! फिफा वर्ल्डकप 2026 चा थरार आता शिखरावर पोहोचलाय. 32 संघांचं आव्हान संपुष्टात आलंय, आता उरलेत फक्त 16 संघ. ‘करो या मरो’च्या या राउंड ऑफ 16 मध्ये, एक चूक आणि थेट घरवापसी. जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर आता ताकद पणाला लावावीच लागेल. यंदा राउंड ऑफ 16 मध्ये कॅनडा, मोरक्को, पॅराग्वे, फ्रान्स, ब्राझील, नॉर्वे, मॅक्सिको, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इजिप्त, कोलंबिया आणि अर्जेंटिना हे संघ आहे. यापैकी कोणते संघ पुढच्या फेरीत जागा मिळवतात याची उत्सुकता आहे.

तत्पुर्वी राउंड ऑफ 16 चं वेळापत्रक कसं आहे? ते पाहूयात…

कॅनडा विरुद्ध मोरोक्को : 4 जुलै, ह्यूस्टन स्टेडियम, रात्री 10:30 वाजता.
पॅराग्वे विरुद्ध फ्रान्स : 5 जुलै, फिलाडेल्फिया स्टेडियम, पहाटे 2:30 वाजता
ब्राझील विरुद्ध नॉर्वे : 6 जुलै, न्यू जर्सी स्टेडियम, पहाटे 1:30 वाजता
मेक्सिको विरुद्ध इंग्लंड : 6 जुलै, मेक्सिको सिटी स्टेडियम, सकाळी 5:30 वाजता
पोर्तुगाल विरुद्ध स्पेन : 7 जुलै, डॅलस स्टेडियम, दुपारी 12:30 वाजता
अमेरिका विरुद्ध बेल्जियम : 7 जुलै, सिएटल स्टेडियम, सकाळी 5:30 वाजता
अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त : 7 जुलै, अटलांटा स्टेडियम, रात्री 9:30 वाजता
स्वित्झर्लंड विरुद्ध कोलंबिया : 8 जुलै, बीसी प्लेस, व्हँकुव्हर, पहाटे 1:30 वाजता

राउंड ऑफ 16 मध्ये कोणत्या लढतींकडे लक्ष असेल? ते पाहूयात…

पोर्तुगाल विरुद्ध स्पेन : राउंड ऑफ 16 मध्ये युरोपातील दोन मोठे संघ भिडणार आहे. हा या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना असणार आहे. या सामन्याकडे खासकरून रोनाल्डोच्या चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
अर्जेंटीना विरुद्ध इजिप्त : गतविजेता अर्जेंटीना संघ सध्या फॉर्मात आहे. लियोनल मेस्सीच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत आहे. असं असताना मोहम्मद सलाहच्या झुंजार इजिप्त संघाचा सामना वाटतो तितका सोपा नसेल.
ब्राझील विरुद्ध नॉर्वे : ब्राझील संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं मानलं जातं. पण आता परीक्षा कठीण असणार आहे. ब्राझीलची या फेरीत लढत अर्लिंग हॉलंड असलेल्या नॉर्वे संघासी होणार आहे.

Exit mobile version