Asian Games 2023 : भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा 2023 (Asian Games 2023) मध्ये सुवर्ण कामगिरी करत असल्यानं भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. मात्र एका भारतीय खेळाडूमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. हेप्टाथलॉन स्पर्धेत (Heptathlon competition) भारतीय खेळाडूंमधील वाद समोर आला आहे. हेप्टॅथलॉनमध्ये तृतीयपंथी खेळाडूने पदक जिंकल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरोपी करणारी आणि जिच्यावर आरोप होतोय, त्या दोघेही भारतीय खेळाडू आहेत. भारताची महिला खेळाडू स्वप्ना बर्मन (Swapna Burman) हिने तिसर्या क्रमांकावर राहिलेल्या नंदिनी अगासरावर (Nandini Agasara) गंभीर आरोप केले आहेत.
Aashish Shelar : वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन गावभर नाचतात? शेलारांचं टीकास्त्र
खरं तर, भारतीय धावपटू स्वप्ना बर्मनने रविवारी (1 ऑक्टोबर) महिलांच्या हेप्टॅथलॉन अंतिम स्पर्धेत चौथे स्थान पटकावले. म्हणजेच एक पाऊल मागे राहिल्याने तिचे पदक हुकले. हे पदक सहकारी भारतीय धावपटू नंदिनी अगासराने जिंकले. नंदिनी हेप्टॅथलॉनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिली आणि कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. यावरूनच या दोन भारतीय खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला आहे.
नंदिनीने एकूण 5712 गुण मिळवले, जो वैयक्तिक सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. 800 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत तिनं अव्वल स्थान मिळवलं. 800 मीटर स्पर्धेव्यतिरिक्त नंदिनीने 200 मीटर शर्यतही जिंकली, त्यात तिला 936 गुण मिळाले.
Nandini Agasara (Heptathlon): Bronze #IndiaAtAsianGames #AGwithIAS #AsianGames2023 pic.twitter.com/KFezzDtg6j
— India_AllSports (@India_AllSports) October 1, 2023
नंदिनीने पदक जिंकल्यावर स्वप्ना बर्मनने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केले. या तिने नंदिनीचं ट्रान्सजेंडर असं वर्णन केले आहे. स्वप्नाने लिहिले की, ‘चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एका ट्रान्सजेंडर महिलेकडून माझे कांस्यपदक गमवावे लागले आहे. तिने ते पदक माघारी द्यावे, कारण ते अॅथलेटिक्सच्या नियमांच्या विरोधात आहे. कृपया, मला मदत करा आणि मला पाठिंबा द्या, असं ट्विट स्वप्नाने केलं आहे. तिच्या ट्विटमुळं क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, स्वप्ना बर्मनच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर कांस्यपदक जिंकल्यानंतर नंदिनीने भारत सरकारचे आभार मानले. भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन आणि भारत सरकारने मला दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे. या पदकासाठी मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी विशेषत: भारत सरकारचे आभार मानते. धन्यवाद, तुम्ही प्रत्येकांना मला पाठिंबा दिला, अशा भावना तिने पदक जिंकल्यानंतर व्यक्त केल्या.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. भारताच्या एकूण पदकांची संख्या 50 वर पोहोचली आहे.