मुंबई : भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) आज खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना भारताने जिंकला असून आज दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ आज मैदानात उतरला आहे. दरम्यान आज भारतीय संघात दोन महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने ईशान किशन व शार्दूल ठाकूर यांना आज बाहेर बसवण्यात आले आहे .
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये विजय संपादन केल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय मालिका विजयासाठी प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे पहिला एकदिवसीय सामना भारतीय संघाने जिंकला असल्याने भारत आघाडीवर आहे. तर आजचा सामना जिंकून भारत मालिका विजयाकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नांत असेल.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान भारतीय संघाने आजच्या सामन्याच्या अनुषंगाने संघामध्ये दोन महत्वाचे बदल केले आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुनरागमन केले आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदावर परतला असल्याने ईशान किशनला विश्रांती देण्यात आली आहे.
तसेच दुसरा महत्वपूर्ण बदल म्हणजे अष्टपैलू म्हणून शार्दूल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला आजच्या सामन्यात संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्येही दोन बदल करण्यात आले आहे. यामध्ये इन्गिसच्या जागी अॅलेक्स कॅरी परतला असून नॅथन एलिस मॅक्सवेलच्या जागी खेळत आहे.
शेतकरी नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे देणार, जाणून घ्या संपर्क क्रमांक
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
भाजपाला आमची गरज नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, महादेव जानकर स्पष्टच बोलले
ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लाबुशेन,मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा