Umesh Yadav : क्रिकेटर उमेश यादव (Umesh Yadav) याच्या घरी महिला दिनी कन्येचा जन्म झालाय. स्वतः उमेश यादव याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच उमेश यादव यांच्या (Father) वडिलांचं निधन झालं होतं. त्या दुखानंतर आता उमेश यादव यांच्या घरी कन्यारत्नचे आगमन झाले आहे. (Ind vs Aus 4th test) आपल्या सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर करत उमेशने लिहिले, ‘ही एक लहान मुलगी आहे. अभिमानी पालक तान्या आणि उमेश. आता उमेश यादव अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीला मुकू शकतो.
Blessed with baby girl ❤️ pic.twitter.com/nnVDqJjDGs
— Umesh Yaadav (@y_umesh) March 8, 2023
उमेश यादवने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते त्याचे अभिनंदन करत आहेत. उमेश यादवचे चाहते वेगवेगळ्या प्रकारे अभिनंदन करत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की, माझ्या भावाचे अभिनंदन. दुसर्या यूजरने लिहिले, “वाह होळीच्या दिवसाच्या शुभेच्छा.” दुसर्याने ट्विट करून लिहिले की, उमेश भाई लक्ष्मीच्या आगमनाबद्दल खूप खूप अभिनंदन. अशा प्रकारे चाहत्यांनी उमेशचे अभिनंदन केले. उमेश यादव जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा वडील झाले, तेव्हाही त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला.
सध्या उमेश यादव पत्नी तान्या आणि लहान मुलीसोबत आहे. अशा परिस्थितीत अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटीला तो मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांची जागा मोहम्मद सिराज दरेमदार सांभाळू शकतात. सिराजला शेवटच्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते, असे यापूर्वी बोलले जात होते.
Team India Holi Celebration : ‘रंग बरसे’ गाण्यावर कोहली, रोहितचा ढासू डान्स; अशी साजरी केली धूळवड
तिसर्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवला संघाचा भाग बनवण्यात आले. तिसऱ्या सामन्यात शमीला विश्रांती देण्यात आली होती. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादवने 3 विकेट घेतल्या. यासह त्याने भारतात खेळताना 100 बळीही पूर्ण केले.