Download App

विनेश फोगट प्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार निकाल जाहीर…

लवाद कोर्टात विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, या खटल्याची सुनावणी 11ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Vinesh Phogat: भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधू (Paris Olympics) कुस्तीपटू विनेश फोगटला  पॅरिस ऑलिम्पिकमधून (Vinesh Phogat) जास्त वजनामुळं (दि 8 ऑगस्ट) अपात्र ठरवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला लवाद कोर्टात देत विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी 11ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

विनेश फोगट प्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार निकाल जाहीर… 

विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईनंतर सामान्य नागरिकांसह संसदेत देखील याचे पडसाद उमटले होते. त्यानंतर विनेशने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती.

विनेशने कोर्टात दोन अपील केले होते. त्यातील पहिला मुद्दा उपस्थित केला होता की आपलं वजन आता मोजले जावे, कारण फायनल सुरू व्हायला अजून चार तास (मेल लिहिण्याच्या वेळी) बाकी आहेत… ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. तर दुसरा मुद्दा असा होता की- मी उपांत्य फेरीपर्यंत जिंकले आहे आणि त्यावेळी माझे वजन जास्त नव्हते. मला किमान रौप्य पदक मिळायला हवे होते, अशी अपील विनेशने केली.

वाद पेटला ! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या गाडीवर बांगड्या, शेण फेकले 

विनेशच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. त्यांनी विनेशला संयुक्त रौप्य पदक मिळावं, अशी विनंती केली. या प्रकरणाचा निकाल आज येणार होता. क्रिडा लवाद न्यायायाने निर्णय देण्यासाठी भारतीय वेळेनुसार, 10 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजेपर्यंत वेळ दिला होता. मात्र आता 11 ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे. ॲनाबेले बेनेट या खटल्याचा निकाल देणार आहेत.

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय, असं वाटत असतांनाच विनेश फोगट स्पर्धेतून अपात्र ठरली होती. तिचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त भरलं, ज्यामुळं तिच्यावर अपात्रतेची कारवाई झाली. पण विनेशने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शेवटी तिला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.

 

follow us