Download App

मला कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त व्हायचय; भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयला कळवलं

विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सिरीजमध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता रोहित शर्मानंतर विराट कोहली देखील कसोटीतून निवृत्ती घेणार आहे. (Kohli) विराट कोहलीने याबाबत बीसीसीआयला कळवल्याची सूत्रांची माहिती आहे.

रोहित शर्मानंतर विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. विराट कोहलीने निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बीसीसीआयकडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती विराट कोहलीला करण्यात आली आहे. आगामी इंग्लंडसारखा महत्वाचा दौरा आहे. त्यामुळे निवृत्तीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केली आहे. दरम्यान, विराट कोहलीलीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Rohit Sharma Retirement : रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूला कोण Miss करणार नाही? वीरेंद्र सेहवाग

विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सिरीजमध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. त्याने केवळ पर्थ कसोटीत शतक केले होते. मात्र, त्यानंतर विराट कोहलीच्या बॅटमधून धावा आटल्या होत्या. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 1-3 असा पराभव झाला होता.

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द

विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 210 डावांमध्ये विराट कोहलीने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतके करणारा विराट कोहली एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे.

रोहित शर्माचीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये त्याचा अलिकडचा फॉर्म चांगला राहिलेला नाही. कसोटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी रोहित एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती

follow us

संबंधित बातम्या