Virat Kohli :  किंग कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर? जाणून घ्या कारण

Virat Kohli  : पुढील काही दिवसात अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताचा

Virat Kohli

Virat Kohli

Virat Kohli  : पुढील काही दिवसात अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची देखील भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कोहली पुन्हा एकदा भारतासाठी खेळताना दिसणार आहे. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

या अपडेटनुसार, विराट कोहली (Virat Kohli) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. कोहली हॅमस्ट्रिंगच्या (IND vs AFG ODI Series) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला असल्याची माहिती समोर येत आहे.

13  जूनपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत आता विराट कोहली दिसणार नाही. मात्र याबाबत आतापर्यंत बीबीसीआयकडून (BCCI) कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नुकतंच झालेल्या आयपीएल 2026 स्पर्धेत विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्यांने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार खेळी करत आरसीबीला दुसऱ्यांदा विजेतेपदापर्यंत नेले.

तर दुसरीकडे विराट कोहलीसह रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील या मालिकेत दिसणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेतील एक किंवा दोन सामने खेळणार आहे. तो संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध नसणार असं सांगण्यात येत आहे.

भारत आणि अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक

6 ते 10 जून 2026, न्यू चंदीगड (मुल्लानपूर), एकमेव कसोटी

पहिली वनडे : 13 जून 2026, धरमशाला

दुसरा वनडे : 17 जून 2026, लखनऊ

तिसरा वनडे : 20 जून 2026, चेन्नई

410 ग्रॅम सोने, दुबईत घर, जय पवारांना 10 कोटींचे कर्ज अन् 8 कोटींचा थकीत प्राप्तिकर; विक्रम काकडेंची संपत्ती किती ?

Exit mobile version