Download App

वीरेंद्र सेहवाग मोठ्या संकटात, लहान भावाला पोलिसांनी केली अटक; नेमकं काय घडलं?

चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणात विनोद सेहवाग न्यायालयात हजर राहिले नाही म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

Virendra Sehwag : भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) मोठ्या संकटात सापडला आहे. विरेंद्र सेहवागच्या छोट्या भावाला चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने विनोद सेहवाग यांना फरार घोषित केले होते. चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणात न्यायालयात हजर राहिले नाही म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

वीरेंद्र सेहवागचे बंधू विनोद सेहवाग यांच्या विरोधात सात कोटी रुपयांच्या चेक बाऊन्सचा खटला न्यायालयात सुरू आहे. याच प्रकरणात त्यांना न्यायालयात हजर व्हायचे होते. परंतु, ते काही न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केले. यानंतर न्यायालयाने विनोद सेहवाग यांची न्यायालयात रवानगी केली. आता विनोद सेहवाग यांच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरही लवकरच सुनावणी होईल.

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्यात दुरावा, लवकरच घेणार ग्रे घटस्फोट, नेमका काय असतो हा घटस्फोट?

विनोद सेहवाग माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांचे लहान भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. वीरेंद्र सेहवागला दोन मोठ्या बहिणी आहेत. तर विनोद त्यांचे लहान भाऊ आहेत. याच विनोद सेहवाग यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या प्रकरणात त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली आणि चंदीगडमध्ये सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान,  वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सध्या त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे सुद्धा चर्चेत आहे. सेहवाग आणि त्याची पत्नी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून आता ते विभक्त होणार असल्याचे बोललं जातंय. ते लवकरच त्यांचा घटस्फोट (Divorce) घेणार आहेत. त्यांचा घटस्फोट हा ग्रे घटस्फोट (Gray Divorce) असण्याची शक्यता आहे. या संकटात असतानाच वीरेंद्र सेहवागच्या कुटुंबात दुसरं संकट आलं आहे.

विश्वचषकानंतर कोहली किक्रेटला करणार रामराम?; सेहवागच्या विनंतीने भुवया उंचावल्या

follow us