IML 2025 Final : इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज मास्टर्सने (West Indies Masters) श्रीलंका मास्टर्सचा (Sri Lanka Masters) 6 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या फायनलमध्ये 16 मार्च रोजी इंडिया मास्टर्स (India Masters) आणि वेस्ट इंडिज मास्टर्स आमने- सामने असणार आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या रोमांचक सामन्यात, वेस्ट इंडिज मास्टर्सने विजय मिळवला. दुसऱ्या सेमीफायलनमध्ये प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज मास्टर्सने 5 विकेट्स गमावून 179 धावा केल्या होत्या तर श्राीलंका मास्टर्सला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 173 धावा करत्या आल्या.
प्रथम फलंदाजी करताना, वेस्ट इंडिज मास्टर्सची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज मास्टर्सला धक्का बसला. सलामीवीर ड्वेन स्मिथ खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर विल्यम पर्किन्स आणि लेंडल सिमन्स यांनी डावपुढे नेला मात्र 12 चेंडूत 17 धावा करून सिमन्स बाद झाला आणि त्यानंतर पर्किन्स देखील बाद झाला. अडचणीत आलेल्या संघाला कर्णधार ब्रायन लाराने संभाळले लारासोबत दिनेश रामदिन आणि चॅडविक वॉल्टनने शानदार खेळी करत वेस्ट इंडिज मास्टर्सला 179 धावांपर्यंत पोहोचवले. रामदिनने 22 चेंडूत 50 धावा काढत नाबाद राहिला. तर 33 चेंडूत 41 धावा काढून लारा रिटायर हर्ट झाला आणि वॉल्टनने 20 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
𝐓𝐡𝐞 #𝐖𝐞𝐬𝐭𝐈𝐧𝐝𝐢𝐞𝐬𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫𝐬 𝐬𝐞𝐭 𝐒𝐚𝐢𝐥 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 #IMLT20 𝐅𝐢𝐧𝐚𝐥 💥🏁
The Masters shined under pressure, and have powered their way to compete for the 𝐔𝐥𝐭𝐢𝐦𝐚𝐭𝐞 𝐏𝐫𝐢𝐳𝐞 🏆💪#TheBaapsOfCricket #IMLonJioHotstar #IMLonCineplex pic.twitter.com/E49mG1fUOL
— INTERNATIONAL MASTERS LEAGUE (@imlt20official) March 14, 2025
180 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका मास्टर्सने चांगली सुरुवात करत कर्णधार कुमार संगकारा आणि उपुल थरंगा यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली मात्र त्यानंतर संगकारा 15 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर लाहिरू थिरीमाने 7 चेंडूत फक्त 9 धावा करुन बाद झाला आणि थरंगा 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर अॅशले गुणरत्नेने या सामन्यात श्रीलंका मास्टर्सला कमबॅक करवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला दुसऱ्या टोकातून कोणाचीही साथ मिळाली नाही.
शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंका मास्टर्सला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता होती मात्र त्यांना फक्त 8 धावा काढत्या आल्या. गुणरत्ने 42 चेंडूत 66 धावा करत नाबाद राहिला. वेस्ट इंडिज मास्टर्सकडून टिनो बेस्टने 4 विकेट्स घेतल्या तर ड्वेन स्मिथने दोन विकेट घेतल्या.