सुपर-8ची समीकरणे गुंतागुंतीची; नेट रन रेट प्लसमध्ये नेण्यासाठी भारताला काय करावे लागेल?

भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांचे 4-4 गुण समान झाल्यास उपांत्य फेरीत प्रवेशाचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे होणार आहे.

Untitled Design 104

Untitled Design 104

What does India need to do to take its net run rate to plus? : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026च्या पुढील दोन सामन्यांपूर्वी भारतीय संघासाठी नेट रन रेट हा फायनलच्या शर्यतीतील सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारतीय संघाचे पुढील सामने झिम्बाम्बवे आणि वेस्ट इंडिज विरोधात होणार आहेत. या दोन्ही सामन्यांमधील विजयाचा फरक, केलेली धावसंख्या आणि लक्ष्याचा पाठलाग किती षटकांत पूर्ण केला जातो, यावर भारताचा अंतिम नेट रन रेट मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.

जर भारताने दोन्ही सामने 75 धावांच्या फरकाने जिंकले आणि प्रत्येकी सुमारे 230 धावा उभारल्या, तर अंतिम नेट रन रेट अंदाजे +1.23 पर्यंत पोहोचू शकतो. मात्र विजयाचा फरक वाढवून दोन्ही सामने 120 धावांनी जिंकले, तर भारताचा नेट रन रेट हा थेट +2.73 पर्यंत झेपावू शकतो. फलंदाजी करताना लक्षाचा पाठलाग किती वेगाने केला जातो, याचाही नेट रन रेटवर मोठा परिणाम होतो. उदाहरणार्थ, 175 धावांचे लक्ष्य 15 षटकांत गाठल्यास नेट रन रेट सुमारे +0.31 राहू शकतो. पण तेच लक्ष अवघ्या 10 षटकांत पूर्ण केल्यास नेट रन रेट तब्बल +2.63 पर्यंत वाढू शकतो.

DCP थेट म्हणाले तक्रार घेणार नाही काय करायचे ते करा; मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात काय घडलं?

मिश्र परिस्थितीत, एका सामन्यात 75 धावांनी विजय आणि दुसऱ्या सामन्यात 12 षटकांत 175 धावांचा यशस्वी पाठलाग केल्यास भारताचा नेट रन रेट सुमारे +1.33 राहू शकतो. दरम्यान, गुणतालिकेत साऊथ आफ्रिकेचा सध्याचा नेट रन रेट +3.8 इतका आहे, तर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट +5.35 वर पोहोचलेला आहे. त्यामुळे जर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला अगदी कमी फरकाने जरी पराभूत केले, तरी भारतासाठी उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते.

एकंदरीत, भारतीय संघासाठी आता केवळ विजय पुरेसा नाही. मोठ्या फरकाने विजय, वेगवान फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजी या तिन्ही बाबींचा संगम साधल्यासच उपांत्य फेरीचे दार खुले राहणार आहे. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता या दोन निर्णायक सामन्यांकडे लागले आहे.

Exit mobile version