Download App

बीसीसीआयने का रद्द केला इम्पॅक्ट प्लेअर? नियम अन् अटी काय? जाणून घ्या, सविस्तर..

बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर हा नियम अस्तित्वात आणला होता. नंतरच्या काळात आयपीएल स्पर्धेतही हा नियम लागू करण्यात आला होता.

Impact Player Rule : इम्पॅक्ट प्लेअर रुल नेमका काय आहे यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्रॉफी स्पर्धेतून इम्पॅक्ट प्लेअर नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम आयपीएलच्या पुढील तीन सत्रात कायम राहणार आहे. बीसीसीआयने (BCCI) काही वर्षांपूर्वी हा नियम अस्तित्वात आणला होता. नंतरच्या काळात आयपीएल स्पर्धेतही हा नियम लागू करण्यात आला होता. चला तर मग जाणून घेऊ या की इम्पॅक्ट प्लेअर नियम काय आहे..

काय आहे इम्पॅक्ट प्लेअर नियम

या नियमानुसार नाणेफेक झाल्यानंतर प्रत्येक संघाला आपल्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त आणखी पाच पाच खेळाडूंची नावे देण्यास परवानगी आहे. सामना दरम्यान या पाचपैकी कोणत्याही एका खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले जाते. आयपीएल मधील नियमातील 1.3 क्लॉजनुसार इम्पॅक्ट प्लेअर केव्हाही बोलवता येऊ शकतो. यासाठी कोणतेच लिमिट नाही. इम्पॅक्ट प्लेअर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करू शकतो. या नियमानंतर इम्पॅक्ट प्लेअर बाहेर गेल्यानंतर त्याचा उपयोग सामन्यात पुन्हा करता येत नाही.

IPL 2025 साठी नाही होणार मेगा लिलाव, शाहरुख खान का संतापला? वाचा, बैठकीची Inside Story

इम्पॅक्ट प्लेअर त्याच्या कोट्यातील चार ओव्हर टाकू शकतो. इम्पॅक्ट प्लेअर ज्या खेळाडूच्या बदल्यात मैदानात आलेला असेल त्या खेळाडूने कितीही ओव्हर टाकल्या असतील तरी इम्पॅक्ट प्लेअरला मात्र त्याचा चार ओव्हरचा कोटा पूर्ण करता येतो. आयपीएल मध्ये एखाद्या संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार विदेशी खेळाडूंचा समावेश केला असेल तर तर त्यांना फक्त एकच भारतीय खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेता येईल.

जर एखाद्या संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी विदेशी खेळाडू घेतले असतील तर त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अन्य विदेशी खेळाडूंना संधी देत येईल. आयपीएलच्या नियमातील क्लॉज 1.11 नुसार पावसामुळे जर सामन्यातील ओव्हर कमी केल्या असल्या तरी इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावर याचा काहीच परिणाम होणार नाही. एका सामन्यात एक संघ फक्त एकदाच इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करू शकतो.

IPL 2024 संपताच BCCI ची मोठी घोषणा, मैदानावर राबणाऱ्यांना मिळणार 25 लाख रुपये

follow us