Download App

राहुल द्रविड ऐवजी आयर्लंड दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणारे सितांशु कोटक कोण?

Sitanshu Kotak : भारतीय संघ तीन टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंसह, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आयर्लंड मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे, तर द्रविडच्या जागी सितांशु कोटक यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवले जाणार आहेत.

18 ते 23 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहची कसोटी असणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) सध्याचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे या दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार होते, परंतु आता ते जाणान नसल्याचे निश्चित झाले आहे. नवीन योजनांनुसार, लक्ष्मण आता भारतात राहून एनसीएच्या शिबिरात खेळाडूंचा सराव घेणार आहेत.

आता शहीद पोलिसांच्या पुनर्विवाह केलेल्या विधवांनाही मिळणार वेतन, गृहविभागाचा मोठा निर्णय

कोण आहेत सितांशु कोटक?
2 वर्षांहून अधिक काळ भारत अ संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले कोटक हे भारतीय संघासोबत आयर्लंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत. किंबहुना मागच्या आयर्लंड दौऱ्यात तसेच द्रविड अँड कंपनीला विश्रांती देण्यात आली तेव्हा ते भारताच्या कोचिंग सेटअपचा भाग होते. त्यानंतर लक्ष्मण यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली, तर कोटक यांनी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले.

कोटकची देशांतर्गत कामगिरी उत्कृष्ट
कोटक हे सौराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते. त्यांनी 130 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 41.76 च्या सरासरीने 8,000 धावा केल्या आहेत. त्यांनी आपल्या देशांतर्गत कारकिर्दीत एकूण 18 शतके झळकावली, त्यापैकी 15 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणि तीन लिस्ट ए मध्ये आहेत. यासोबतच ते उपयुक्त गोलंदाजही होते. त्यांनी फर्स्ट क्लासमध्ये 70 आणि लिस्ट ए मध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत.

काँग्रेसचं नगरी पॉलिटिक्स! दोन्ही मतदारसंघांवरील दावेदारीने ‘मविआ’ची वाढली धाकधूक

सौराष्ट्रचे प्रशिक्षक
कोटक यांनी निवृत्तीनंतर लगेचच कोचिंगला सुरुवात केली. त्यांनी दीर्घकाळ सौराष्ट्रचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. ते IPL मध्ये गुजरात लायन्सचे सहाय्यक प्रशिक्षक देखील होते आणि 2019 मध्ये NCA प्रमुख म्हणून द्रविडचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर, कोटक यांनी भारत A चे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

Tags

follow us