Download App

Rinku Singh : रिंकूने षटकार खेचला तरीही रन मिळालेच नाहीत; मैदानात नेमकं काय घडलं?

Rinku Singh : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या (IND vs AUS)  मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार खेचत रिंकू सिंह (Rinku Singh) याने संघाला विजय मिळवून दिला. पण, तरीही आता काहीसं झालं आहे की त्याने षटकार मारल्यानंतरही त्या धावा त्याच्या खात्यात जमा झालेल्या नाहीत. पण, हे घडलं कसं, प्रकरण नेमकं काय आहे.

भारताने विश्वचषक गमावला पण टी-20 च्या पहिल्याच सामन्यात कांगारुंना नमवलं. ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेलं 209 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. भारताने 3 गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारताने लक्ष्य गाठत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. टी-20 सिरीजचा पहिला सामना काल विशाखापट्टणमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा विजय झाला. भारताचे स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव आणि इशांत किशन दोघांनीही धुव्वादार बॅटींग केली. इशांतपाठोपाठ सुर्यानेही अर्धशतक ठोकल्याने भारताच्या विजयासाठी योगदान मोठं मिळालं.

Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय

पण, आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे. रिंकू सिंहने षटकार मारल्यानंतरही त्या धावा काउंट झाल्या नाहीत. या सामन्यात भारताने 19.5 षटकात 208 धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी एकाच रनची गरज होती. रिंकू सिंग क्रीजवर होता. त्याच्यासमोर गोलंदाजीसाठी शॉन अॅबॉट होता. त्याने बॉल टाकला त्यावर रिंकूने षटकार खेचला. भारताला विजय मिळाला. विजयी षटकार रिंकूनेच मारला असेच सर्वांना वाटत होते. पण त्याआधीच टीम इंडियाचा विजय झाला होता.

तसं पाहिलं तर अॅबॉटने टाकलेला बॉल हा नो बॉल होता. अशा परिस्थितीत भारताने त्याच नो बॉलवर विजय मिळवला होता. त्यामुळे रिंकू सिंहने षटकार मारला तरीही त्याचा उपयोग झाला नाही. त्याधावा रिंकू सिंहच्या खात्यात जमा झाल्या नाहीत.

Team India : सलग दहा विजय, फायनलध्ये धडक; पडद्यामागचा ‘हिरो’ निवृत्तीच्या वाटेवर

Tags

follow us