Virat Kohli IPL Retirement: चाहत्यांना मोठा धक्का; विराट कोहली आयपीएलमधून निवृत्त होणार?

Virat Kohli IPL Retirement :  भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत असून तो आयपीएलमधून

Virat Kohli IPL Retirement

Virat Kohli IPL Retirement

Virat Kohli IPL Retirement :  भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत असून तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोराने सुरु आहे. सध्या त्याच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात एक अहवाल आला आहे. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या अहवालानुसार  विराट कोहली आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार नाही.

रेव्हस्पोर्ट्झचे पत्रकार रोहित जुगलान (Rohit Juglan) यांच्या वृत्तानुसार, विराट कोहली आरसीबीच्या ब्रँड ऑपरेशन्सशी संबंधित व्यवसाय कराराच्या मुदतवाढीवर स्वाक्षरी करणार होता, परंतु त्याने करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली किंवा आरसीबीने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नसले तरी, या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पत्रकार रोहित जुगलान म्हणाला की, गेल्या वेळी, मेगा लिलावापूर्वी, मला कल्पना होती की विराट कोहलीला (Virat Kohli IPL Retirement) आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी एका ब्रँडसोबतचा त्याचा करार अपडेट करावा लागेल. पण आता बातमी अशी आहे की त्याने त्याचा करार अपडेट केलेला नाही आणि आता अशी अटकळ आहे की विराट आरसीबी फ्रँचायझीला त्याचा चेहरा न वापरता पुढे नियोजन करावे अशी इच्छा आहे.

मोठी बातमी, विसेमळा गोळीबार प्रकरण, भाजपच्या सुनील बागुलांच्या पुतण्याला अटक

तर दुसरीकडे 19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

70 वा हिंदी फिल्मफेअर पुरस्कार अन् अभिनेत्री छाया कदम यांची दोन्ही स्वप्न पूर्ण

Exit mobile version