Download App

WIPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सला इतिहास रचण्याची संधी, आज मुंबई इंडियन्ससोबत अंतिम लढत

  • Written By: Last Updated:

मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात आज (26 मार्च) मुंबई इंडियन्सचा (MI) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश मिळवला. दोन्ही संघांची कामगिरी पाहता जेतेपदाचा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा स्थितीत महिला लीगच्या पहिल्याच सत्रात तिला चॅम्पियन बनून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाला महिला लीगमध्येही वर्चस्व राखण्याची संधी आहे.

अंतिम फेरीत मुंबईला मोठी धावसंख्या करायची असेल, तर कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगली खेळी खेळावी लागेल. त्याचबरोबर नेट सायबर-ब्रंटलाही महत्त्वाचे योगदान द्यावे लागेल. हरमनप्रीत कौरने स्पर्धेच्या सुरुवातीला तीन अर्धशतके झळकावली होती पण तिला तिचा फॉर्म कायम ठेवता आला नाही. हरमनने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सविरुद्ध केवळ 14 धावा केल्या.

Sudhir Mungantiwar : राज्यातील ‘इतकी’ नाट्यगृहे करणार सुसज्ज! 

मुंबई इंडियन्सचा संघ एकेकाळी गुणतालिकेत अव्वलस्थानी धावत होता, पण दिल्ली कॅपिटल्सने हळूहळू लय मिळवून मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानावरून दूर केले. आतापर्यंत कर्णधार मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मारिजाने कॅप यांनी दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे.

लीग टप्प्यात दिल्ली आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दोन सामने झाले. पहिल्या सामन्यात मुंबईने आठ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर पराभवाचा बदला घेत दिल्लीने मुंबईचा नऊ गडी राखून पराभव केला. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत समान 12 गुण मिळवले होते, परंतु दिल्लीचा संघ चांगल्या धावगतीमुळे अव्वल होता. अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे, जिथे मुंबई इंडियन्सने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. या मैदानावर दिल्लीने दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

काँग्रेसकडून राजकारणासाठी आरक्षणाचा वापर; अमित शाहांचे काँग्रेसवर ताशेरे

मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग-11: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक.

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य प्लेइंग-11: मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, तानिया भाटिया (विकेटकीपर), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव.

Tags

follow us