Download App

महिला आशिया करंडक आजपासून; सलामीला भारताचा सामना पाकिस्तानशी; जाणून घ्या वेळापत्रक

आशिया करंडक विजेतेपद राखण्याची भारतीय महिलांची मोहीम आजपासून सुरू होत आहे. आजचा सामना इंडिया विरूद्ध पाकिस्तान असा होणार.

  • Written By: Last Updated:

Womens Asia Cup T20 IND vs PAK : भारतीय महिलांची आजपासून आशिया करंडक विजेतेपद राखण्याची मोहिम सुरू झाली. यामध्ये पहिला सामना पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने होत आहे. (IND vs PAK ) महिलांच्या या स्पर्धेत भारतीय संघाचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. (Asia Cup) यंदाचीही स्पर्धा त्यास अपवाद नसेल असंच चित्र आहे.

Hardik-Natasa : हार्दिक-नताशा विभक्त होण्याची घोषणा अन् चर्चा संपत्तीची, मुलगा कुणाकडं असणार?

यंदाची स्पर्धा ५०-५० षटकांची (एकदिवसीय प्रकार) आहे. आत्तापर्यंत चार वेळा ५०-५० षटकांची ही स्पर्धा झाली त्यात चारही वेळा भारताने विजेतेपद मिळवलेले आहे. तर, चारपैकी तीन वेळा ट्वेन्टी-२० प्रकारात विजेतेपदाचा करंडक उंचावलेला आहे. गतवेळेस (२०२२) बांगलादेशचा पराभव करून हरमनप्रीतच्या भारतीय संघाने विजेतेपदाची मोहर उमटवली होती.

भारतीयांचा आत्मविश्वास

भारतीयांसाठी पाकिस्तानचा संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी समजला जात असला तरी भारतीयांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. १४ पैकी ११ सामन्यांत विजय मिळवलेला आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीमुळे भारतीयांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघ बऱ्याच काळानंतर मैदानात उतरणार आहे. मे महिन्यात त्यांची इंग्लंडविरुद्ध मालिका झाली होती. मात्र, त्यात त्यांना ०-३ असा एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता.

स्मृती मानधना फॉर्मात Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का,हा स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार

स्मृती मानधना कमालीची फॉर्मात आहे. ही भारतासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तिचं सलग तिसरं शतक थोडक्यात हुकलं होतं. आफ्रिकेविरुद्धच्या याच मालिकेत वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारने आठ विकेट मिळवल्या होत्या. तसंच, दीप्ती शर्मा, सजीवन सजना आणि श्रेयांका पाटील या फिरकी गोलंदाज भारतीय संघाची ताकद वाढवणाऱ्या आहेत.

स्पर्धेची गटवारी

अ गट – भारत, पाकिस्तान, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती

ब गट – बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, थायलंड

भारताच्या साखळी लढती

१९ जुलै – विरुद्ध पाकिस्तान.

२१ जुलै – विरुद्ध अमिराती.

२३ जुलै – विरुद्ध नेपाळ

follow us