Hardik-Natasa : हार्दिक-नताशा विभक्त होण्याची घोषणा अन् चर्चा संपत्तीची, मुलगा कुणाकडं असणार?

Hardik-Natasa : हार्दिक-नताशा विभक्त होण्याची घोषणा अन् चर्चा संपत्तीची, मुलगा कुणाकडं असणार?

Hardik Natasa Divorce : गेली चार महिन्यांपासून ज्या प्रकरणाची चर्चा होती त्यावर अखेर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालं आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा घटस्फोट झाला आहे. (Hardik Natasa) याबाबतची सविस्तर माहिती हार्दिकने आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे. (Natasa) दरम्यान, घटस्फोटानंतर अनेक विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत.

 काहीतरी घडल्याची चर्चा Team India : हार्दिक पांड्याला पुन्हा धक्का, हा स्टार खेळाडू होणार भारतीय संघाचा कर्णधार

हार्दिक आणि नताशा यांच्यातील संबंध काही ठिक नाहीत अशी चर्चा आयपीएलपासून सुरू होती. आयपीएलमध्ये ती एकाही सामन्यासाठी उपस्थित नव्हती. तसंच, टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत बहुतेक खेळाडूंच्या पत्नी अमेरिका -वेस्ट इंडीजमध्ये संघासोबत होत्या. परंतु, हार्दिक पंड्या एकटाच असल्याचं दिसून येत होतं. हे सगळं पाहता यांच्यात काहीतरी घडलं आहे याची शक्यता बळावली होती.

मालमत्तेवर हक्क

श्रीलंका दौऱ्यासाठी संघ निवड झाल्यानंतर काही वेळातच हार्दिकने इंस्ट्राग्रामवरून ही घटना जाहीर केली. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या मालमत्तेचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिकच्या मालमत्तेत नताशा स्टॅनकोविचचा हक्क असेल का? ती किती पोटगी घेऊ शकते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

91 कोटी संपत्ती

अहमदाबाद मिररच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, घटस्फोटानंतर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के भाग नताशाला द्यावा लागेल अशी अफवा आहे. आता अशा परिस्थितीत हार्दिककडे किती कोटींची संपत्ती आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर एकूण 91 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा हार्दिक मालक आहे.

62 कोटींच नुकसान  नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण हार्दिकने केले घटस्फोटावर शिक्कामोर्तब

हार्दिकचे मुंबईत 30 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. याशिवाय त्यांचं वडोदरा येथे एक आलिशान घर आहे. तर त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. दरम्यान, मोठ्या अफवाही पसरलेल्या असतात. जर हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के रक्कम त्याच्या पत्नीला द्यावी लागली तर त्याला एकूण 62 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे.

मालमत्ता आईच्या नावावर

मात्र, यामध्ये एक यातील महत्वाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटापूर्वीही हार्दिक पांड्याने त्याच्या संपत्तीतील 50 टक्के रक्कम आईच्या नावावर केली आहे. नुकताच त्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये तो सांगतो की त्याने त्याच्या घरापासून त्याच्या कारपर्यंत सर्व काही त्याच्या आईच्या नावावर घेतलं आहे.

हार्दिक पोस्टमध्ये काय म्हणाला?

गेल्या चार वर्षांपासून असलेल्या नात्यातून आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्यण घेणं फार कठीण होतं. तसंच, आमच्या दोघांसाठी सर्वस्व असलेला आमचा मुलगा अगस्त्य याचं आम्ही सहपालक म्हणून कायम राहू. या कठीण काळात आमच्या खासगी आयुष्यात एकांत द्याल, अशी मी विनंती करतो, असंही हार्दिक आपल्या निवेदनात म्हटला आहे.

चार वर्षांनी विभक्त

नताशा आणि हार्दिकने २०२०मध्ये लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काहीच महिन्यांनी नताशाने त्यांच्या पहिल्या मुलाला अगस्त्यला जन्म दिला. गेल्याच वर्षी नताशा आणि हार्दिकने पुन्हा मोठ्या धामधुमीत लग्नगाठ बांधली होती. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने त्यांनी लग्न केलं होतं. पण, अखेर आता ४ वर्षांनी त्यांचा संसार मोडला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube