Asia Cup 2023 : Mohmmad Siraj चा मोठेपणा! ग्राऊंडस्टाफला बक्षीसाची रक्कम दिली…

Asia Cup 2023 : Mohmmad Siraj चा मोठेपणा! ग्राऊंडस्टाफला बक्षीसाची रक्कम दिली…

Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कमालीची कामगिरी केली आहे. मोहम्मद सिराजने 7 षटकांमध्ये 21 धावा देत 6 बळी घेतले आहेत. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना कोंडीत पकडल्याचंच चित्र दिसून येत होतं. भारताने सामना जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आलायं. हा पुरस्कार दिल्यानंतर मोहम्मद सिराजच्या मोठेपणाचं सर्वांनाच दर्शन झालं. सिराजने बक्षीसाची रक्कम ग्राऊंडस्टाफला दिली आहे.

बक्षीसाची रक्कम देताना सिराज म्हणाला “हा रोख पुरस्कार मी ग्राऊंड्समन्सना देतो ज्यांच्या मुळे हा आशिया चषक पार पडू शकला. ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्णच होऊ शकली नसती.” आशिया खंडातील बहुतांश सामने पावसाने विस्कळीत केले. या कालावधीत ग्राऊंड्समन्सना पुन्हा पुन्हा कव्हर आणावे लागले. या स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली” असं सिराजने स्पष्ट केलं आहे.

चिठ्ठीत ‘आदित्य’, CM शिंदेंनी केलं ‘कान्हा’; बछड्यांच्या नावातही राजकारणाचा खेळ

सिराजच्या या कृतीमुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका यांनीही त्यांचे कौतुक केले. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत भारताने हा दुसरा आशिया चषक पटकावला आहे. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र, त्यांचा हा निर्णय फेल ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. अवघ्या 15.5 षटकांचा भेदक मारा करीत भारताने श्रीलंकेच्या संघाला तंबूत पाठवलं आहे. 15.5 षटकांमध्ये श्रीलंका संघ अवघ्या 50 धावा करु शकला आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

अंतिम सामन्यावर भारताची पकड इतकी मजबूत होती की, श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अशातच भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सामन्यात आपली धमक दाखवत एकाच षटकात 4 फलंदाजांना माघारी पाठवत एक विक्रमच रचला आहे. मोहम्मदची एकदिवसीय सामन्यामधील ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

आशिया चषकाचा अंतिम सामना आज श्रीलंकेतील कोलंबोमध्ये पार पडला. आजच्या सामन्यात होमस्पीचवरच भारताने श्रीलंकेला धूळ चारली आहे. सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेचा हा निर्णय मैदानात फलंदाजीसाठी उतरचा फेल ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

जगभरात तीनच गोलंदाजांचा विक्रम आहे, की त्यांनी आत्तापर्यंत एकाच षटकात 4 विकेट्स घेतले आहेत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने हा विक्रम केला होता. त्यानंतर मोहम्मद सामी, आदिल रशीद यांनी हा विक्रम केला होता. आता एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 5 बळी घेणारा सिराज पहिला भारतीय आणि जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराजने (Mohmmad Siraj) आतापर्यंत 6 विकेट्स घेतल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube