Womens Asian Champions Trophy 2024 : महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये (Womens Asian Champions Trophy 2024 ) भारतीय संघाने (Team India) शानदार कामगिरी करत तिसऱ्या सामन्यात थायलंडविरुद्ध (Thailand) मोठा विजय नोंदवला आहे. या विजयानंतर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने प्रवेश केला आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने थायलंडविरुद्ध 13-0 विजय नोंदवला. या स्पर्धेत भारतीय संघाने सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
बिहारमधील राजगीर हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताची फॉरवर्ड दीपिकाने 3, 19, 43, 45 आणि 45व्या मिनिटाला तर प्रीती दुबेने 9व्या आणि 40व्या मिनिटाला,लालरेमसियामीने 12 आणि 56व्या मिनिटाला, ब्युटी डंगने 30 आणि 53 व्या मिनिटाला आणि मनीषा चौहानने 55 आणि 58 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये शानदार सुरुवात करत थायलंडवर तीन गोल केले.
या सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला दीपिकाने फिल्ड गोल केला तर प्रीती दुबेने नवव्या मिनिटाला आणखी एक फिल्ड गोल करत थायलंडला बॅकफूडवर नेले. तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी दोन गोल करत स्कोअर 5-0 असा केला. त्यामुळे पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत भारताने 5-0 अशी आघाडी घेतली होती.
तळोजा मेट्रो प्रकल्प डोंबिवलीकरांसाठी फायदेशीर ठरणार, मंत्री रवींद्र चव्हाणांना विश्वास
तर या सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये चार गोल करत स्कोअर 9-0 असा केला. तर क्वार्टरमध्ये भारताचा स्कोर 13-0 होता. या स्पर्धेत आता भारतीय संघाचा पुढील सामना चीनशी होणार आहे. सध्या भारत नऊ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
Video : विधेयक फाडले अन् संसेदत करू लागली Haka डान्स, महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल