पाकिस्तानला BCCI अन् ICC चा दणका; ‘या’ देशात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार शिफ्ट?

पाकिस्तानला BCCI अन् ICC चा दणका; ‘या’ देशात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार शिफ्ट?

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2025) स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहेत. परंतु, आता ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून कदाचित या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडून हिरावलं जाऊ शकतं. जर हायब्रीड मॉडेलसाठी पाकिस्तान तयार झाला नाही तर ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत शिफ्ट होण्याची दाट शक्यता आहे. आयसीसी यावर सध्या विचार करत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात येऊन खेळावं अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही हे आता निश्चित झालं आहे. त्यानंतर आता पाकिस्ताननेही आडमुठी भूमिका घेतली असून हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे. याच कारणामुळे आता आयसीसी अन्य पर्यायांचा विचार करत आहे.

१६ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफी

याआधी १६ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आली होती. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. तर सेमी फायनलमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ पोहोचले होते. अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला धूळ चारत चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकली होती. भारतीय संघाचा विचार केला तर टीम इंडिया ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यानंतरचा दुसरा सामना अनिर्णित राहिला होता. साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकल्यानंतर काहीच फायदा झाला नाही.

ICC Champions Trophy 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयकडून भूमिका स्पष्ट

आठ संघात होणार १५ सामने

चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या स्पर्धांची सुरुवात १९ फेब्रुवारील होईल. अंतिम सामना ९ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी मीडिया द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार आयसीसीचे एक पथक १० ते १२ नोव्हेंबरपर्यंत लाहोरला पोहोचेल. या पथकाकडून स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. याच दरम्यान ११ नोव्हेंबरला वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

दुबई किंवा शारजाहमध्ये सामने

पाकिस्तान दौऱ्यात सर्वात मोठा मुद्दा सुरक्षिततेचा आहे. याच कारणामुळे भारत सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात येऊन खेळण्याची परवानगी दिलेली नाही. आता हायब्रीड मॉडेलवर भारतीय संघाचे सर्व सामने दुबई किंवा शारजाहमध्ये आयोजित केले जाऊ शकतात अशीही चर्चा सुरू झाली आहे. परंतु, अशी व्यवस्था करण्यास पाकिस्तान बोर्डाने नकार दिला तर कोण सामने आयोजित करणार हा प्रश्न आहे.

टीम इंडियाला धक्का! चिवट फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube